जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबई पोलिसांना मोठं यश, फरार ड्रग्ज सप्लायर कैलास राजपूतला काढलं शोधून

मुंबई पोलिसांना मोठं यश, फरार ड्रग्ज सप्लायर कैलास राजपूतला काढलं शोधून

मुंबई पोलिसांना मोठं यश, फरार ड्रग्ज सप्लायर कैलास राजपूतला काढलं शोधून

कैलाश राजपूत 2014 पासून फरार आहे

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 सप्टेंबर : देशातील सर्वात मोठा आणि कुख्यात फरार ड्रग्ज सप्लायर कैलास राजपूत याला शोधून काढल्यामुळे मुंबई पोलिसांना मोठं यश मिळाले आहे. रेड कॉर्नर नोटीसनंतर कैलास राजपूत हा लंडनमध्ये सापडला आहे. लवकरच त्याला भारतात आणण्यासाठी प्रक्रिया करणार सुरू केली जाणार आहे. भारतात सिंथेटिक ड्रग पुरवठा करणारा राजपूत हा मोठा सप्लायर आहे. त्याच्या प्रत्यार्पण प्रक्रिया सुरू करण्यासाठी मुंबई पोलीस CBI च्या संपर्कात आहे. परराष्ट्र मंत्रालयासोबत, CBI च्या मदतीनं, मुंबई पोलीस समन्वय साधणार आहे. या माध्यमातून त्याला भारतात आणले जाणार आहे. सिंथेटिक ड्रग्स विशेषतः मेफेड्रोनचा देशात पुरवठा करण्यात राजपूतचा मोठा वाटा आहे. मुंबई पोलिसांनी त्याला आता शोधून काढलं आहे. तसेच कैलास राजपूतचा पासपोर्ट UK मधील अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. तसेच राजपूत सध्या लंडनमध्ये नजरकैदेत असल्याची माहिती मिळाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कैलाश राजपूत 2014 पासून फरार आहे आणि भारतातून पळून जाण्यात यशस्वी झाल्यानंतर तो दुबईत जाऊन लपला, त्यानंतर तो जर्मनीला गेला आणि आता लंडनमध्ये लपला आहे.

 हेही वाचा -  चंदीगड MMS लिक प्रकरणाचं मुंबई कनेक्शन? तपासात मोठी माहिती उघड

पोलीस विभागातील सूत्रांनी सांगितले की, राजपूतने देशात सिंथेटिक ड्रग्स विशेषत: मेफेड्रोनचा पुरवठा बेकायदेशीरपणे केला होता. फेब्रुवारी 2018 मध्ये, पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वाखालील अंबोली पोलीस पथकाने दोन जणांना अटक केली आणि 2.73 कोटी किमतीचे 13.5 किलो पार्टी ड्रग्ज जप्त केले होते. याची किंमत आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर बाजारात 25 कोटी किमत होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात