वाशिम, 28 फेब्रुवारी : शिवसेना (Shivsena) नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संजय राठोड काही दिवसांपूर्वी पोहरादेवी येथे दर्शनासाठी गेले होते. यावेळी मोठ्या संख्येने त्यांचा समर्थक वर्ग जमा झाला होता. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी संजय राठोड यांच्यावर टीका केली जात होती. दरम्यान पोहरादेवी येथून मोठी बातमी समोर आली आहे. पोहरादेवी इथं आणखी 21 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या गावातील एकूण कोरोना बाधितांची संख्या झाली 29 इतकी आहे. तीन दिवसांपूर्वी गावातील महंत आणि इतर 8 जणांना झाली होती कोरोनाची बाधा झाली होती. आतापर्यंत एकूण 157 जणांचे चाचणी करण्यात आली असून आणखी नव्या 90 जणांचा रिपोर्ट येणं बाकी आहे. हे ही वाचा- देवेंद्र फडवणीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा हल्ला संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यांच्यावरील आजची कारवाई ही अन्यायकारक आहे. केवळ विरोधी पक्षाच्या मागणीमुळे ही कारवाई झाली आहे. चौकशी आणखी होणे बाकी असतांना वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेणे चुकीचे आहे. समाजामध्ये राजीनाम्यावरून नाराजी’ असल्याचं पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज यांनी म्हटलं आहे. ‘पूजा चव्हाण (Pooja Chavan) प्रकरणाची अद्याप चौकशी झालेली नाही. फक्त विरोधकांनी या प्रकरणी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे आम्ही आधीच्या मागणीवर ठाम आहोत. चौकशी केल्यानंतर कारवाई केली असती तर स्वीकारले गेले असते. या प्रकरणामुळे समाजाची नाहक बदनामी झाली आहे. मोठ्या प्रमाणात चिखलफेक झाली आहे. कोरोनाचा काळ ओसरल्यानंतर आम्ही बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ, या बैठकीला संजय राठोड नक्की येतील’, असंही जितेंद्र महाराज यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.