मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मोठी बातमी : मुंबईनंतर आता अमरावतीतही आढळली स्फोटकं, पाठलाग करून 2 तरुणांना पकडलं

मोठी बातमी : मुंबईनंतर आता अमरावतीतही आढळली स्फोटकं, पाठलाग करून 2 तरुणांना पकडलं

अमरावती (Amravati) जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकात जिलेटिनसह स्फोटके (Explosives) आढळली आहेत.

अमरावती (Amravati) जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकात जिलेटिनसह स्फोटके (Explosives) आढळली आहेत.

अमरावती (Amravati) जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकात जिलेटिनसह स्फोटके (Explosives) आढळली आहेत.

अमरावती, 19 मार्च : मुंबईमध्ये हाय प्रोफाइल परिसरात एका कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळल्याने राज्यभरात गदारोळ झालेला असतानाच अमरावती जिल्ह्यातही (Amravati District) असाच एक धक्कादायक प्रकार समोर आहे. गुरुवारी पहाटे 3 वाजताच्या दरम्यान अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकात जिलेटिनसह स्फोटके (Explosives) आढळली आहेत.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी केली. यावेळी रात्री 2 युवक मोटरसायकलने जिलेटिन व स्फोटके नेत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर सदर तरुणांचा पोलिसांनी पाठलाग केला असता पोलिसांना 200 नग जिलेटिन व 200 नग नॉक डिटोनेर आढळून आले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखा व तिवसा पोलिसांनी या संदर्भात सखोल चौकशी केली असता यामध्ये 2 नावे समोर आली आहेत. तसंच या संपूर्ण प्रकारामागे मोठी टोळी असल्याचा संशय असल्याने पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - '...तर वाझेंचा मनसुख हिरेन होईल', भीती व्यक्त करत राणा दाम्पत्याने NIA कडे केली सुरक्षेची मागणी

दरम्यान, मुंबईतील स्फोटकांचा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चिला जात असतानाच अमरावतीतही स्फोटकं सापडल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. अमरावतीत सापडलेल्या स्फोटकांचा वापर नक्की कशासाठी करण्यात येणार होता आणि या कृत्यामागे नेमका कोणाचा हात आहे, हे शोधून काढण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.

याप्रकरणी आगामी काळात पोलीस तपासातून काय निष्पन्न होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Explosives, Gelatin explosives