मुंबई, 20 ऑगस्ट : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात (Major accident on Samruddhi Mahamarg) झाल्याची माहिती समोर येत आहे. लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन अपघात झाला असून या दुर्घटनेत तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथून मजूर घेऊन समृद्धी हायवेच्या कामावर हे मजूर जात होते. त्याच दरम्यान तळेगाव येथे हा अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गावर काम करणारे बिहारी मजूर असल्याचं वृत्त समोर येत आहे. एकूण 15 मजूर होते आणि त्यापैकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात pic.twitter.com/eSA69XuUVO
— News18Lokmat (@News18lokmat) August 20, 2021
पुण्यात वाहतूक पोलिसांची मुजोरी; नो पार्किंगमधील गाडी चालकासह उचलली, LIVE VIDEO मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात इतरही काही मजूर जखमी झाले आहेत. या जखमी मजूरांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले आहे. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम मोठ्या वेगात सुरू आहे. हा संपूर्ण महामार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच संपूर्ण महामार्गावर ठिकठिकाणी वेगाने महामार्गाचे काम सुरू आहे त्याच दरम्यान तळेगाव येथे भीषण अपघात झाला आहे.