मुंबई, 24 जुलै : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या हा कार्यक्रम लोकप्रिय आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाचे तीन पर्व झाले आहेत. आता या कार्यक्रमाबाबत प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण, या आता बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व कधी येणार याबाबत प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात विचारणा होत आहे. या प्रेक्षकांसाठी आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कारण, बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे. यासंबंधीचा टिझर कलर्स मराठीच्या इन्टग्राम पेजवर अपलोड करण्यात आलाय.
बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालक प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे आहेत. बिग बॉस हिंदी प्रमाणेच बिग बॉस मराठी हा कार्यक्रमही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या रिअॅलिटी शोलाही चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. मराठी लोकांना हा खेळ लोकांना चांगलाच आवडला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला असंख्य चाहते मीस करत आहेत. हेही वाचा - ‘एक जुनं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने…’; ‘तो’ फोटो शेअर करत सुबोध भावेंनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष विशाल निकम तिसऱ्या सीझनचा विजेता - बिग बॉस मराठी 3 चा ग्रँड फिनाले डिसेंबरमध्ये उत्साहात पार पडला होता. या पर्वाचा विजेता विशाल निकम हा ठरला. जय दुधाणे आणि विशाल यांच्यात हा शेवटचा सामना रंगला होता. यामध्ये महाराष्ट्राचा रांगडा गडी विशाल निकम याने बाजी मारली. खेळाडूवृत्ती, टास्क जिंकण्याची त्याची जिद्द, घरातील वावर, स्पष्टवक्तेपणा यामुळे तो नेहेमीच चर्चेत राहिला. त्याला 20 लाख आणि ट्राफी त्याला देण्यात आली होती. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सदस्य 100 दिवस अनेक कॅमेरांच्या नजरकैदेत राहिले.