रायगड, 03 जानेवारी : आमच्या मतांवर निवडून आलेल्यांनी आमच्यावर टीका करू नये, त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानावेत. शिंदे यांनी आम्हाला सांगितले राऊतांना निवडून द्यावे, नाहीतर त्याच वेळी यांचा करेक्ट कार्यक्रम झाला असता. खासदार संजय राऊत यांनी जनतेतून खासदारकी लढवून निवडून येऊन दाखवावे अशी टीका शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी संजय राऊतांवर केली आहे. ते रायगड येथे बोलत होते. यावेळी त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावर ही टीका केली.
खासदार संजय राऊत यांनी जनतेतून खासदारकी लढवून निवडून येऊन दाखवावे असे खुले आव्हान आ.गोगावले यांनी केली. यावेळी भरत गोगावले यांनी दीपक केसरकर यांच्या विधानाचे समर्थन केले, तर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका ही केली.
हे ही वाचा : भाजप अध्यक्षांसमोर फक्त 30 सेकंदांचं भाषण, नाराजीच्या चर्चांवर पंकजा मुंडे म्हणाल्या…
आमच्या मतांवर निवडून आलेल्यांनी आमच्यावर टीका करू नये, त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानावेत. शिंदे यांनी आम्हाला सांगितले राऊतांना निवडून द्यावे, नाहीतर त्याच वेळी यांचा करेक्ट कार्यक्रम झाला असता. खासदार संजय राऊत यांनी जनतेतून खासदारकी लढवून निवडून येऊन दाखवावे अशी टीका शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी संजय राऊतांवर केली आहे.
संजय शिरसाटांवर शिंदे गट नाराज
बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाच्या केटरर्सला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ‘आपण एका जबाबदार व्यक्तीचे चिरंजीव आहोत असं करणे योग्य नाही’ असं म्हणत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाला सल्ला दिला.
बाळासाहेबांची शिवसेना गटाचे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाने एका केटरर्सला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यावर गुलाबराव पाटील याांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : ‘युतीत शून्य जागा जरी मिळाली तरी मान्य’ गुलाबराव पाटलांचं मोठं विधान
‘आपण एका जबाबदार व्यक्तीचे चिरंजीव असून असं करणं योग्य नाही आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती व या क्लिप मधून एका व्यक्तीला धमकी दिल्याचा दावा करण्यात आला होता मात्र खरच त्यांनी असं केलं असेल तर त्यांची समज देवू असंही गुलाबराव पाटील म्हणाले.