मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Bhandara ZP Election: नाना पटोलेंना धक्का, खंदे समर्थक रमेश डोंगरे पराभूत, भाजपच्या प्रियांक बोरकर विजयी

Bhandara ZP Election: नाना पटोलेंना धक्का, खंदे समर्थक रमेश डोंगरे पराभूत, भाजपच्या प्रियांक बोरकर विजयी

भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत एक धक्कादायक निकाल समोर आला आहे. जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष रमेश डोंगरे यांचा पराभव झाला आहे. रमेश डोंगरे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे खंदे समर्थक आहेत.

भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत एक धक्कादायक निकाल समोर आला आहे. जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष रमेश डोंगरे यांचा पराभव झाला आहे. रमेश डोंगरे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे खंदे समर्थक आहेत.

भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत एक धक्कादायक निकाल समोर आला आहे. जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष रमेश डोंगरे यांचा पराभव झाला आहे. रमेश डोंगरे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे खंदे समर्थक आहेत.

नेहाल भुरे, प्रतिनिधी

भंडारा, 19 जानेवारी : भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल (Bhandara Zilla Parishad Election Result) समोर आले आहेत. या निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना एक मोठा धक्का बसला आहे. कारण, या निवडणुकीत विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे हे पराभूत झाले आहेत. रमेश डोंगरे (Ramesh Dongre) हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. रमेश डोंगरे हे नाना पटोलेंचे खंदे समर्थक आणि विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष असूनही पराभूत झाल्याने काँग्रेस पक्षासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. (Big jolt for Nana Patole in Bhandara ZP election)

भंडारा जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष असलेले रमेश डोंगरे हे भागडी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत भाजपच्या प्रियांक बोरकर यांनी रमेश डोंगरे यांचा पराभव केला आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या एकूण 52 जागांपैकी आतापर्यंत 22 जागांचे निकाल हाती आले आहेत.

महाविकास आघाडीचा भाजपला धोबीपछाड, काय सांगतेय आकडेवारी?

भंडारा जिल्हा परिषद एकूण जागा 52

भाजप – 9

शिवसेना –

राष्ट्रवादी – 8

काँग्रेस –13

बसपा - 1

इतर –3

भंडारा जिल्हा परिषद 52 जागा

भाजप विजयी उमेदवार

1) अड्याळ - सुवर्णा मुनघटे

2) एकोडी - मागेश्वरी नेवारे

3) भागडी - प्रियांक बोरकर

4)कुंभली- वनिता डोये

5)अंबागढ़- द्रुपडा डोंगरे

6)आमगांव- विनोद बान्ते

7)येरळी- बंडू बनकर

8)खापा- दिलीप सार्वे

9)आंधळगाव- उमेश पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस विजयी उमेदवार

1) आष्टी - राजू देशभ्रतार,

२) कांद्री - परमेश्वर नलगोपुलवार,

3)दीघोरी मोठी अविनाथ ब्राम्हणकर

4) खामारी - रजनीश बनसोड

5)गणेशपुर- यशवंत सोनकुसरे

6)खोकरला- नंदा झंझाड

7)पाँचगाव- आनंद मलेवार

8)वरठी- एकनाथ फेंडर

काँग्रेस विजयी उमेदवार

1) कोथुरना - गायत्री वाघमारे

2) चिखला - कृष्णकांत बघेल

3)बपेरा- रमेश पारधी

4) पिंपळगाव - पुजा हजारे

5) परसोडी - शीतल राऊत

6) डोंगरगाव - देवा इलमे

7) पोहरा -विद्या कुंभरे

8)कोढ़ा -गंगाधर जीभकाटे

9)पालांदुर- सरिता कापसे

10)ब्रम्ही- मोहन पंचभाई

11)वडद--मदन रामटेके

12)सरांण्डी (बुज)-सारिका रंगारी

13)मोहरना- विशाखा माटे

इतर –1

1)पिंडकेपार अपक्ष दीपलता समरीत

2)धारगाव- अस्मिता डोंगरे

3)देव्हाडी - राजेश सेलोकर

बसपा - 1

मासाळ मतदारसंघात लता नरूले विजयी

एकनाथ खडसेंना होमग्राऊंडवर झटका, शिवसेनेने एकहाती मिळवली सत्ता

जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेल्या एकनाथ खडसे यांना हा एक मोठा धक्का आहे. 17 जागांपैकी शिवसेनेने सर्वाधिक म्हणजेच 9 जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे आता बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेची एकहाती सत्ता आली आहे.

बोदवड नगरपंचायतीच्‍या आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार 17 पैकी राष्ट्रवादीला केवळ 7 जागांवर विजय मिळविता आला आहे. विशेष म्‍हणजे राष्ट्रवादीने 17 पैकी 17 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. परंतु, शिवसेनेने आतापर्यंतच्‍या निकालात मुसंडी मारल्‍याने एकनाथ खडसेंना त्यांच्याच होम ग्राउंडवर धक्का बसल्‍याचे चित्र सध्‍यातरी आहे.

केंद्रीय मंत्री भारती पवार यांना दिराचा धक्का

भारती पवार यांना त्यांच्या दिंडोरी येथील मतदारसंघातच पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यानंतर कळवण नगरपंचायतीतही भारती पवार यांच्या नेतृत्वाला अपयश येताना दिसलं. भारती पवार यांचे दीर आमदार नितीन पवार यांनी राष्ट्रवादीला बळ दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 17 पैकी 9 जागांवर विजय मिळाला. तर भाजपला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

First published:

Tags: Bhandara Gondiya, BJP, Nana Patole, Zilla Parishad