भंडारा, 03 डिसेंबर : लहान बाळ चालायला सुरू झालं की त्याच्याप्रत्येक हालचालींवर पालकांची नजर असणे गरजेचे असते. लहान बाळांवरील नजर हटल्यावर बाळाला काही समजत नसल्याने काहीही करण्याची शक्यता असते. दरम्यान असाच एक प्रकार भंडारा जिल्ह्याच्या लाखंदर तालुक्यातील सरांडी बुज येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. अंगणात खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडून दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुज येथे सकाळच्या सुमारास घडली आहे. सान्वी छत्रपाल कुथे असे मृत बालिकेचे नाव आहे.
सान्वी घराशेजारी बालकांसोबत खेळत होती. मुलगी खेळत असल्याने आई घरकामात व्यस्त होती. काही वेळात घरकाम आटोपल्यानंतर बघितले तर सान्वी अंगणात दिसली नाही. त्यामुळे आईने मुलीचा शोध घेतला असता शेजाऱ्यांच्या घराच्या अंगणातील पाण्याच्या टाकीत सान्वी पडलेली दिसली.
हे ही वाचा : ‘कोण नाय कोणचा’ पॅटर्न, 15 वर्षांच्या पोराने केला शाळेबाहेर विद्यार्थ्यावर चाकू हल्ला, पडले 19 टाके
तिला तात्कळ पाण्याबाहेर काढून प्रथम सरांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यानंतर लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी लांखादूर पोलिसांनी मर्ग दाखल केले असून सान्वी च्या दुर्देवी मृत्यू ने हळहळ व्यक्त केली जात आहे.
आठवड्यात दुसरी धक्कादायक घटना
साकोली तालुक्यातील जंगलव्याप्त पापडा येथील श्रध्दा किशोर सिडाम तिसऱ्या वर्गात शिकत होती. अचानक (दि.28) सोमवारी संध्याकाळी 4.30 च्या सुमारास घराबाहेरील परिसरात खेळण्यासाठी गेली. मात्र बाहेर खेळायला गेली परंतु घरी परत आली नाही. याबाबत शोधाशोध केली असता ती सापडली नसल्याने तिच्या पालकांनी उशिरा घटनेची माहिती साकोली पोलीस विभागाला देण्यात आली.
हे ही वाचा : ‘त्याने श्रद्धाचे 35 तुकडे केले, मी तुझे 70 करीन..’ धुळ्यातील तरुणाने गर्लफ्रेंडला दिली धमकी, अन् मग…
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन स्वतः पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी रात्री सुमारे 10.30 वाजता आपल्या ताफ्यासह पापडा गाव गाठले. शोधमोहिमेसाठी श्वान पथकही पाचारण करण्यात आले. मंगळवारी दिवसभर शोध घेऊनही त्या मुलीचा पत्ता लागला नाही अखेर आज बुधवारी सकाळी गावापासून जवळच असलेल्या तणसाच्या ढिगाऱ्यात जळालेल्या अवस्थेत मृतदेह गावकऱ्यांना दिसला.