भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक : भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये थेट लढत

भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक : भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये थेट लढत

या लोकसभा निवडणुकीत भंडारा गोंदिया मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी दिली तर भाजपने सुनील मेंढे यांना रिंगणात उतरवलं. यात नेमका विजय कुणाचा याबद्दल उत्सुकता आहे.

  • Share this:

भंडारा, 18 मे : या लोकसभा निवडणुकीत भंडारा गोंदिया मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी दिली तर भाजपने सुनील मेंढे यांना रिंगणात उतरवलं.

मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार नाना पटोले यांचा विजय झाला होता. त्यांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. नाना पटोलेंना 6 लाख 6 हजार 129 मतं मिळाली तर प्रफुल्ल पटेल यांना 4 लाख 56 हजार 875 मतं मिळाली.

नाना पटोलेंचा राजीनामा

भंडारा गोंदियामध्ये नाना पटोलेंचा विजय झाला असला तरी ही जागा भाजपकडे फार दिवस राहिली नाही. भाजपवर नाराज झालेल्या नाना पटोलेंनी राजीनामा दिला, ते काँग्रेसमध्ये गेले आणि इथे पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकरराव कुकडे यांनी भाजपच्या हेमंत पटले यांचा पराभव केला.

गडकरींविरोधात लढत

यावेळी नाना पटोले यांनी काँग्रेसच्या तिकिटावर नागपूरमधून नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवली.त्यामुळे नागपूरच्या लढतीकडेही सगळ्यांचंच लक्ष होतं.

प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी प्रतिष्ठेची जागा

ही जागा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती पण त्यांनी इथून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. आता इथे मतदार राष्ट्रवादीला कौल देतात की ही जागा पुन्हा भाजपला मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

भंडारा गोंदियामध्ये यावेळी 68.27 टक्के मतदान झालं. या मतदारसंघातले 3 विधानसभा मतदारसंघ भंडाऱ्यामध्ये आणि 3 मतदारसंघ गोंदियामध्ये येतात. तुमसर भंडारा, साकोली, अर्जुनी मोरगाव, तिरोडा इथे भाजपचे आमदार आहेत. गोंदियामध्ये काँग्रेसचं वर्चस्व आहे.

===============================================================================

SPECIAL REPORT : लोकसभेनंतर अशोक चव्हाणांची खुर्ची धोक्यात?

First published: May 18, 2019, 8:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading