जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Bhandara Farmer Suicide : अस्मानी संकट शेतकऱ्यांचे आणखी किती बळी घेणार? शेतकऱ्यांने उचलले टोकाचे पाऊल

Bhandara Farmer Suicide : अस्मानी संकट शेतकऱ्यांचे आणखी किती बळी घेणार? शेतकऱ्यांने उचलले टोकाचे पाऊल

Bhandara Farmer Suicide : अस्मानी संकट शेतकऱ्यांचे आणखी किती बळी घेणार? शेतकऱ्यांने उचलले टोकाचे पाऊल

खरिपात लागवडीखालील धान पिक पुराच्या पाण्याने नष्ट झाल्याने चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्याने नायलॉनच्या दोरीने गळफांस घेऊन आत्महत्या केली.

  • -MIN READ Bhandara,Bhandara,Maharashtra
  • Last Updated :

भंडारा, 01 नोव्हेंबर : खरिपात लागवडीखालील धान पिक पुराच्या पाण्याने नष्ट झाल्याने चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्याने नायलॉनच्या दोरीने गळफांस घेऊन आत्महत्या केली. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील चिचोली येथील नर्सरी परिसरात उघडकीस आली आहे. सिताराम महादेव शेंडे (वय 65) राहणार भागडी असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

दरम्यान सिताराम यांची भागडी ते मांढळ मार्गावरील नाल्यानजीक जवळपास दीड एकर शेतजमीन आहे. या शेतजमीनीत पिडीत शेतकऱ्याने खरिपाच्या सुमारास धान पिकाची लागवड केली होती. मात्र खरिपाच्या सुमारास तालुक्यात मुसळधार पावसासह तब्बल तीनदा चुलबंद नदीसह नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यात पीडित शेतकऱ्याची शेती नाल्याच्या बाजूला असल्याने पुराचे पाणी शेतकऱ्याच्या पिकांत जमा झाल्याने शेतकऱ्याचे संपूर्ण पिक नष्ट झाले होते.

जाहिरात

हे ही वाचा :  Video : घराच्या गच्चीवर भरते पक्षांची शाळा, पाहा कोण लावतं हजेरी?

लागवडीचा साधा खर्च निघाला नसल्याने पिडीत शेतकरी मागील काही दिवसांपासून त्रस्त असल्याने अखेर चिचोली येथील नर्सरीतील एका झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांना व लाखांदूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत घटनेचा पंचनामा करीत मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविला. या घटनेत स्थानिक लाखांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली गेली आहे.

बहिणीच्या लग्नाचं कर्ज कसं फेडायचं?

परतीच्या पावसाच्या शेतीचं अतोनात नुकसान झाले असून बळीराजा हवालदील झाला आहे. बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचं आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. आज पुन्हा एकदा एका 20 तरुण शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलं आहे. बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून 20 वर्षाच्या तरूण शेतकऱ्याने आत्महत्या केली.

हे ही वाचा : Video : तरुणानं उभारलं देशातील पहिलं जनावरांचं क्वारंटाईन सेंटर, लम्पीवर देतोय मोफत उपचार

जाहिरात

मागील तीन वर्षांपासून सतत शेती न पिकल्याने शेतकऱ्याच्या 20 वर्षीय मुलाने घरातील पत्र्याच्या आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बीडच्या केज तालुक्यातील देवगाव येथिल दीपक बालासाहेब मुंडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात