मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Bhalchandra Nemade and Eknath Shinde : आपण हरामखोर लोकांना निवडून देतो, त्याचे हे फळं, भालचंद्र नेमाडेंचं संतप्त विधान

Bhalchandra Nemade and Eknath Shinde : आपण हरामखोर लोकांना निवडून देतो, त्याचे हे फळं, भालचंद्र नेमाडेंचं संतप्त विधान

आपणच हरामखोर लोकांना निवडून देतो त्याचे हे फळ आहेत. असे खळबळजनक विधान जेष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांनी केले

आपणच हरामखोर लोकांना निवडून देतो त्याचे हे फळ आहेत. असे खळबळजनक विधान जेष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांनी केले

आपणच हरामखोर लोकांना निवडून देतो त्याचे हे फळ आहेत. असे खळबळजनक विधान जेष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांनी केले

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India

नितीन नांदूरकर (जळगाव), 14 डिसेंबर : सध्या राजकारणात खोक्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मात्र आपणच हरामखोर लोकांना निवडून देतो त्याचे हे फळ आहेत. असे खळबळजनक विधान जेष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांनी केले आहे. दरम्यान सद्यस्थितीत राजकारणात चांगल्या लोकांनी पडू नये अशी परिस्थिती झाली असून सर्वसामान्य माणसांना खोक्याची भाषा चालते का ? असा सवालही भालचंद्र नेमाडे यांनी उपस्थित केला आहे.

दहा ते पंधरा टक्के लोकांचे व्यवस्थित चालले असून अनेकांना मात्र उद्या काय खावं याची काळजी असते. त्यामुळे अशा लोकांनी आता कोणाला निवडून द्यावं याचा विचार केला पाहिजे तरच या लोकशाहीचा उपयोग होईल असे देखील भालचंद्र नेमाडे यांनी जळगावमध्ये एका कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हे ही वाचा : हीच का महाराष्ट्राची भाग्यरेषा? समृद्धी महामार्गावर तरुणाकडून गोळीबार की स्टटंबाजी?

लोक जर असेच मूर्ख राहिले तर असलेच सरकार येत राहणार राष्ट्रवादामुळे आपल्या देशाचं नुकसान होत आहे. मुसलमानांपासून सर्वांनी या देशाला वर आणले आहे. पाकिस्तान चीनमध्ये अत्यंत गरीब लोक असून पाकिस्तानात गरीब स्त्रिया लहान मुलांना हातात घेऊन कामाला जातात युद्ध करायचं म्हणजे तुम्ही त्या स्त्रियांवर बॉम्ब टाकाल असेही नेमाडे म्हणाले.

चिनी सरकार आपला शत्रू असेल पण चीन हा आपला शत्रू म्हणणे चुकीचे असून चिनी सैनिक आपल्याकडे येतात मारामाऱ्या करतात हे चुकीचे आहे. मात्र आपले ही सैनिक तेच करतात असे वक्तव्य ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी राष्ट्रवादावर बोलताना जळगाव मध्ये एका कार्यक्रमाप्रसंगी केले आहे.

हे ही वाचा : अमित शाह महाराष्ट्राचे जावई, सीमावादाचे सर्वाधिक चटके त्यांच्या सासरवाडीला; संजय राऊतांचा टोला

दरम्यान देशावर कायम युद्धाचे वातावरण असून अनेकांना खायला मिळत नाही स्त्रियांना बाहेर पडता येत नाही हे कसं सहन करायचं व अशी राष्ट्रीयता काय कामाची असा सवालही भालचंद्र नेमाडे यांनी उपस्थित केला आहे.

First published:

Tags: Cm eknath shinde, Maharashtra government, Maharashtra News, Maharashtra political news, Maharashtra politics