देहरादून, 20 फेब्रुवारी : भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचं राज्यपालपद सोडल्यानंतर नेटवर्क 18 ला स्फोटक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख संत माणूस असा केला आहे, तसंच उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं, हा नियतीचा खेळ असल्याची टीकाही भगतसिंग कोश्यारी यांनी केली आहे. ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या लायक नसताना त्यांना जबरदस्तीने तिकडे बसवण्यात आलं. उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बळीचा बकरा बनवलं. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे कधीच योग्य नव्हते, त्यांनी पक्ष सांभाळायला हवा होता,’ असा टोलाही भगतसिंग कोश्यारी यांनी लगावला. उद्धव ठाकरेंनी मला विमानातून खाली उतरवलं, विधात्याने त्यांना सत्तेतून खाली खेचलं, असा घणाघात कोश्यारी यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंनी मला विमानातून खाली उतरवलं, नियतीने त्यांना सत्तेतून खाली उतरवलं, भगतसिंग कोश्यारींची सनसनाटी मुलाखत#Shivsena #UddhavThackeray #BhagatsinghKoshyari pic.twitter.com/3bZlDaTd69
— News18Lokmat (@News18lokmat) February 20, 2023
‘उद्धव ठाकरे संत प्रवृत्तीचा माणूस आहे, त्यांनी यापासून लांब राहावं, अशी प्रार्थना मी देवापुढे करतो. कोणाच्या तरी सांगण्यावरून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, त्यांनी संघटना चालवायला पाहिजे होती. उद्धव ठाकरेंना सुळीवर चढवण्यात आलं. मला त्यांच्यावर दया येते,’ असं भगतसिंग कोश्यारी म्हणाले. ‘उद्धव ठाकरेंनी मला विमानातून उतरवलं, प्रभूने त्यांना गादीवरून उतरवलं. मी त्यांना सत्तेतून खाली उतरवलं नाही,’ असं टीकास्त्र भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंवर सोडलं.