मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बेळगाव मनपासाठी मतदान; पालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार?

बेळगाव मनपासाठी मतदान; पालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार?

बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मराठी भाषिकांसाठी ही निववडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे.

बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मराठी भाषिकांसाठी ही निववडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे.

बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मराठी भाषिकांसाठी ही निववडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे.

बेळगाव, 3 सप्टेंबर : बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (Belgaum Municipal Corporation Election) आज मतदान होत आहे. बेळगाव महानगरपालिकेसाठी आज तब्बल आठ वर्षानंतर मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून संपूर्ण कर्नाटक (Karnataka) राज्याचं आणि पश्चिम महाराष्ट्राचं (Western Maharashtra) लक्ष या निवडणुकीकड लागलं आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजप आणि काँग्रेस हे उतरले असून महाराष्ट्र एकीकरण समितीनं (Maharashtra Ekikaran Samiti) त्यांना तगड आव्हान दिलंय.

एकूण 58 जागांसाठी आज मतदान होत असून महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत अधिकृत 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालणार असून मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण बेळगाव शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहराला सध्या पोलीस छावणीच स्वरूप आल असून मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.

अजित पवार संतापले अन् म्हणाले 'या' बातम्या धादांत खोट्या

मराठी भाषिकांसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची असून महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत बेळगाव महापालिकेतील 58 प्रभागांसाठी 375 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून भाजप आणि काँग्रेस या दोन्ही मोठ्या राष्ट्रीय पक्षांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच मोठं आव्हान असणार आहे.

बेळगाव मनपात नगरसेवकांची संख्या 58 आहे. तब्बल आठ वर्षानंतर यंदा निवडणूक होत आहे. यापूर्वी 2013 साली निवडणूक झाली होती. वॉर्ड रचनेबाबत कोर्टात वाद सुरू असल्याने निवडणूक लांबणीवर पडली होती. या निवडणुकीची मतमोजणी 6 सप्टेंबर रोजी होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महापालिकेतील सत्तेसाठी 27 ही मॅजिक फिगर आहे. यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगाव महापालिकेमध्ये महापौर होता. त्यामुळे आता या निवडणुकीत पुन्हा मराठी माणसाच्या हाती सत्ता हेणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

First published:

Tags: Belgaum