जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Belgaum : कानडी पोरांनी कन्नड रक्षक वेदिकेचा फडकावला झेंडा, मराठी मुलांनी धू धू धुतलं, LIVE VIDEO

Belgaum : कानडी पोरांनी कन्नड रक्षक वेदिकेचा फडकावला झेंडा, मराठी मुलांनी धू धू धुतलं, LIVE VIDEO

Belgaum : कानडी पोरांनी कन्नड रक्षक वेदिकेचा फडकावला झेंडा, मराठी मुलांनी धू धू धुतलं, LIVE VIDEO

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र बेळगाव सीमावादावर भाष्य केल्याने मागच्या काही दिवसांपासून जोरदार खडाजंगी सुरू आहे.

  • -MIN READ Belgaum,Belgaum,Karnataka
  • Last Updated :

बेळगाव, 01 डिसेंबर : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र बेळगाव सीमावादावर भाष्य केल्याने मागच्या काही दिवसांपासून जोरदार खडाजंगी सुरू आहे. अशातच बेळगावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरून पुन्हा सीमावाद पेटण्याची शक्यता आहे. बेळगावातील गोगटे कॉलेजमध्ये कार्यक्रमात नाचताना एका मुलाने कन्नड झेंडा फडकवल्याने कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे.  दरम्यान या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. सीमावाद पुन्ह पेटण्याची शक्यता आहे.

जाहिरात

मिळालेल्या माहितीनुसार, गोगटे कॉलजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन साजरा  केला जात होता. यात डान्स करताना बारावीच्या एका विद्यार्थ्याने डान्स करतानाच कर्नाटकचा झेंडा फडकावला. यावर महाराष्ट्राचे समर्थन करणारे विद्यार्थी नाराज झाले. याचा विद्यार्थ्यांनी जाब विचारला. यावरुन दोन्ही गटांमध्ये वाद झाला आणि वादाचं रुपांतर हाणामारीत झाले. कॉलेज व्यवस्थापनाने मध्यस्थी करत हे प्रकरण शांत केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कॉलेज व्यवस्थापनाने पोलिसांनाही याबाबतची माहिती दिली आहे.

हे ही वाचा :  माझ्यामुळे जर भाजपची अडचण होत असेल तर.., उदयनराजे संतापून स्पष्टच बोलले

यानंतर पोलिसांनी कॉलेजबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. याप्रकरणी कोणतीही तक्रार पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेली नाही. पण या घटनेचं पडसाद कॉलेजबाहेरही उमटले. कर्नाटक रक्षणा वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी गोगटे कॉलेजबाहेर निदर्शनं केली. कॉलेजसमोरचा रस्त्यावर टायर जाळून रस्ता बंद करण्यात आला, तसंच महाराष्ट्राविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कर्नाटकवरुन गोव्याला जाणारा रस्त्या अनेक तास जाम करण्यात आला होता.

जाहिरात
जाहिरात

दरम्यान, 3 डिसेंबरला महाराष्ट्रातील दोन मंत्री सीमा वादावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांशी बेळगावात चर्चा करणार आहेत. याआधीच सीमावादावर थेट कॉलेजमध्ये वाद निर्माण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा :  ..तर महाराजांचं नाव घेऊ नका, उदयनराजेंचा भाजपसकट सर्व पक्षांना गंभीर इशारा, म्हणाले..

जाहिरात

महामार्ग रोखला

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा सध्याचा तापलेला विषय. मात्र याच तापलेल्या विषयात अनेकजण आपली पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करत आहेत. अशीच एक घटना बेळगावात घडली. बेळगावच्या गोगटे महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. मात्र या वादाला सीमावादाशी जोडून कन्नड संघटनांनी आंदोलन केलं आणि बेळगाव-गोवा महामार्ग रोखला. मात्र मुळात हा वाद दोन कन्नड विद्यार्थ्यांमधलाच होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात