Home /News /maharashtra /

बेळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत कोरोना नियमांचा फज्जा; MIM कार्यकर्त्यांची तुफान गर्दी, 300 जणांवर गुन्हा दाखल

बेळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत कोरोना नियमांचा फज्जा; MIM कार्यकर्त्यांची तुफान गर्दी, 300 जणांवर गुन्हा दाखल

बेळगावात निवडणुकीच्या प्रसारासाठी असदुद्दीन ओवैसी दाखल झाले आणि त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली.

बेळगाव, 31 ऑगस्ट : बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक (Belgaon Municipal Corporation Election) जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपले शक्ती प्रदर्शन आणि प्रसाराला सुरुवात केली. अखेरच्या टप्प्यात असलेल्या बेळगाव मनपा निवडणुकीत कोविड नियमांच्ची सर्रास पायमल्ली (Covid norms violation) झाल्याचं दिसून येत आहे. बेळगावा मनपा निवडणुकीच्या प्रसारासाठी एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) शहरात दाखल झाले. यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली. असदुद्दीन ओवैसी यांनी बेळगावात निवडणूक प्रचार रॅली काढली. या रॅलीत एमआयएमच्या उमेदवारांसोबतच शेकडोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली. निवडणूक प्रसारा दरम्यान एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी कोविड नियमांना हरताळ फासला आणि सर्रास उल्लंघन केलं. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 300 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 'हे' घराबाहेर पडण्यासाठी घाबरतात तर आम्ही काय करायचं? राज ठाकरेंचा हल्लाबोल बेळगावसह हुबळी-धारवाड आणि गुलबर्गा या तीन महानगरपालिकांसाठी निवडणूक होत आहे. येत्या 3 सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आपली सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. तर बेळगावात भगवा फडकवण्यासाठी एकीकरण समितीने कंबर कसली आहे. कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. त्यातच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे नागरिकांना अनिवार्य केले आहे. मात्र, असे असताना सुद्धा राजकीय नेते याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याचं पहायला मिळत आहे. एकूणच या सर्व परिस्थितीमुळे कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Belgaum

पुढील बातम्या