जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Beed News: आईसाठी बनवला 'स्मार्ट चाकू', चिमुकल्याच्या प्रयोगाचे होणार राष्ट्रपती भवनात सादरीकरण Video

Beed News: आईसाठी बनवला 'स्मार्ट चाकू', चिमुकल्याच्या प्रयोगाचे होणार राष्ट्रपती भवनात सादरीकरण Video

Beed News: आईसाठी बनवला 'स्मार्ट चाकू', चिमुकल्याच्या प्रयोगाचे होणार राष्ट्रपती भवनात सादरीकरण Video

कांदा कापताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून बीडमधील ओमकार शिंदे या विद्यार्थ्याने स्मार्ट चाकू तयार केला. आता त्याला राष्ट्रपती भवनात सादरीकरणाची संधी मिळाली आहे.

  • -MIN READ Bid,Bid,Maharashtra
  • Last Updated :

    रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 8 एप्रिल: ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आजही जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहेत. अलिकडे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीही राष्ट्रीय पातळीवर चमकू लागले आहेत. आईच्या डोळ्यात कांदा कापताना येणारे पाणी पाहून सातवीत शिकणाऱ्या ओंकार शिंदेने स्मार्ट चाकू तयार केला. बीड जिल्ह्यातील कुर्लाच्या या चिमुकल्याला आता राष्ट्रपती भवनमध्ये सादरीकरण करण्याची संधी मिळाली आहे. आईच्या डोळ्यातील पाणी पाहून सुचली युक्ती ओंकार शिंदे हा बीड तालुक्यातील कुर्ला येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये सातवीच्या वर्गात शिकतो. गेल्या वर्षी त्याने एक स्मार्ट चाकू तयार केला होता. या स्मार्ट चाकूची संपूर्ण राज्यभर चर्चा देखील झाली होती. शाळेतून घरी गेल्यानंतर ओंकार याची आई कांदा कापत होती. त्यावेळी त्याच्या आईच्या डोळ्याला पाणी पाहून त्यावेळी त्याला ही स्मार्ट चाकू बनवण्याची युक्ती सुचली.

    News18लोकमत
    News18लोकमत

    शिक्षकांच्या मदतीने बनवला स्मार्ट चाकू आईच्या डोळ्यात पाणी येत असेल तर आपण यावर निश्चितच उपाय शोधू शकतो, असं बोलून दाखवलं. ओंकारनं ही कल्पना ओंकारच्या शाळेतील शिक्षक भाऊसाहेब राणे यांना सांगितली. राणे सरांचे मार्गदर्शन घेत ओंकार स्मार्ट चाकू बनवला कांद्यावर चाकू मारताच त्यातून रासायनिक पदार्थ आईच्या डोळ्यापर्यंतच पोहोचू न देणारा चाकू यांनी तयार केला‌. शेतकऱ्याच्या पोरानं शास्त्रज्ञांनाही टाकलं मागे, गाड्यांसाठी बनवलं खास सेन्सर! राष्ट्रपती भवनात सादरीकरणाची संधी हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी ठरला. त्यानंतर शाळेतील शिक्षक भाऊसाहेब राणे यांनी या स्मार्ट चाकूचे पेटंट रजिस्टर केले. आता नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनमध्ये आयोजित फेस्टिव्हल ऑफ इनोव्हेशन अॅण्ड इंटरप्रीनरशिपमध्ये या प्रयोगाची निवड झाली आहे. नवोपक्रम आणि उद्योजकता उत्सव अंतर्गत ओंकार स्मार्ट चाकू प्रयोगाचे सादरीकरण करणार आहे. राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते होणार उद्घाटन या फेस्टिव्हलसाठी ओंकारसह शिक्षक भाऊसाहेब राणे यांची बीड जिल्ह्यातून निवड झाली आहे. भारत सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि अहमदाबाद येथील राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने या फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार आहे. या शाळेला रविवारी नाही तर सोमवारी सुट्टी, कारण वाचून वाटेल अभिमान! महाराष्ट्रातून 9 विद्यार्थ्यांची निवड या फेस्टिवलसाठी महाराष्ट्रातून 9 विद्यार्थी आणि 9 शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले आहे. संपूर्ण देशभरामधून या ठिकाणी 60 विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यातून एकमेव विद्यार्थी ओंकार शिंदे याची निवड झाली आहे. याबाबत शिक्षण विभागाकडून त्याचे अभिनंदन देखील केले गेले आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात