रस्त्यांवर ठिकठिकाणी अनेक अपघात होत असतात. याची लगेच माहिती मिळत नसल्यानं किंवा रुग्णवाहिका वेळेवर पोहेचत नसल्यानं अनेकांचा जीवही गेल्याच्या घटना घडतात.
मात्र यावर उपाय म्हणून जालन्यातल्या एका युवकानं अॅक्सिडेंट अलर्ट सेन्सर बनवलंय. पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट
जालन्यातल्या एका युवकानं अपघाताची माहिती मिळण्यासाठी एक भन्नाट युक्ती शोधून काढलीये. अपघात झाल्यावर तात्काळ पोलीस प्रशासना आणि गाडी मालकाच्या कुटुंबियांना तात्काळ काॅल आणि लोकेशन मिळणार आहे.
अंबड तालुक्यातील दुधपुरी या गावातील राजेंद्र पाचफुले या युवकानं अपघात अलर्ट सेन्सर बनवला आहे. या यंत्रात प्रशासनाचा आणि कुटुंबियांचा मोबाईल नंबर कोडींग करून ठेवावा लागतो.
त्यामुळं अपघात झाल्यावर लगेच तुमच्या मोबाईलवर अलर्ट वाजणार आणि तुम्हाला अपघाताचं लोकेशन मिळणार आहे.
राजेंद्र पाचफुले हा जालना जिल्ह्यातल्या दुधपुरी या एका छोट्या गावातला.. घरची परिस्थितीही हलाखिची आहे.. दोन एकर शेतात आई वडिल कष्ट करून घराचा गाडा हाकतात.
त्यात त्याने तीन महिन्यांचा एक स्कील डेव्हलपमेंटचा कोर्स केला.. त्यातुनच त्याला ही कल्पना आली आणि ‘अॅक्सिडेंट अलर्ट सेन्सर’चा त्याने बनवलं..
देश आणि राज्यातल्या रस्त्यांवर अनेक अपघात होत असतात. अपघातांची प्रशासनाला वेळेवर माहिती मिळत नसल्यानं अनेकांचा हकणाक जीवही जातो. मात्र अशा पद्धतीचं सेन्सर आपण आपल्या दुचाकीला बसवलं तर अपघाताचा काॅल आणि लोकेशन अलर्ट तात्काळ प्रशासनाला मिळेल. त्यामुळं अनेक जीव वाचू शकतील.