बीड, 1 एप्रिल : महाराष्ट्राची लोककला आणि त्याच लोककलेतील अस्सल मराठीची ठसकेबाज लावणी ही तमाम महाराष्ट्रातील मराठी जनांची अस्मितादेखील आहे. याच लोककलेची शिवम विष्णू इंगळे या तरुणाला मोठी आवड आहे. दरम्यान, त्याची लावणी सादर करण्याची कला पाहून ऑरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने दखल घेतली.
बीडच्या गेवराईत नॉनस्टॉप 26 तास लावणी नृत्याचा विश्वविक्रम करण्यात आला आहे. या विश्वविक्रमामुळे युवा लावणीसम्राट शिवम इंगळेच्या नृत्याची ऑरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.
सलग 26 तास लावणी सादर करणाचा विश्व विक्रम युवा लावणीसम्राट शिवम इंगळे सातारकर याने केला आहे. या विक्रमाची ऑरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली आहे. शिवमने न थकता, व थांबता सलग 26 तास लावणीचे सादरीकरण करून विक्रमाला गवसणी घातली. वर्ल्ड रेकॉर्ड करताना शिवमला आलेला अनुभव त्याच्याच शब्दात त्याने न्यूज 18 लोकमत सोबत शेअर केला.
MPSC Success Story: डॉक्टर कन्येची भरारी, महाराष्ट्रात अव्वल येत झाली वनअधिकारी, पाहा Video
नृत्याचा हा कार्यक्रम बीडच्या गेवराई येथील बालग्राममध्ये 30 मार्च रोजी सकाळी 11.40 वाजता सुरू झाला होता. तो 31 मार्च रोजी 1.40 वाजता थांबला. शिवमने यशाला गवसणी घातल्यानंतर ऑरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डतर्फे त्याला सन्मानित करण्यात आले. यापूर्वी तामिळनाडू ट्रेडिशनल करकम फोक डान्स येथे सलग 5 तास लावणी सादर करण्याचा विक्रम ए. शहाजान यांच्या नावे होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.