मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /MPSC Success Story: डॉक्टर कन्येची भरारी, महाराष्ट्रात अव्वल येत झाली वनअधिकारी, पाहा Video

MPSC Success Story: डॉक्टर कन्येची भरारी, महाराष्ट्रात अव्वल येत झाली वनअधिकारी, पाहा Video

X
MPSC

MPSC वनसंरक्षक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. बीड जिल्ह्यातील सीमा शेख ही विद्यार्थिनी राज्यात अव्वल आली आहे.

MPSC वनसंरक्षक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. बीड जिल्ह्यातील सीमा शेख ही विद्यार्थिनी राज्यात अव्वल आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

    रोहित देशपांडे, प्रतिनिधी

    बीड, 1 एप्रिल: स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि संयम ही त्रिसूत्री आवश्यक मानली जाते. अलीकडे मुलीही जिद्दीने स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करत आहेत. बीड जिल्ह्यातील सीमा शेख हिने एमपीएससी वनसंरक्षक परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. मादळमोही सारख्या ग्रामीण भागातील कन्या असणारी सीमा वनअधिकारी झाली असून ती मुलींमध्ये राज्यात अव्वल आली आहे.

    सीमा शेख यांचा शैक्षणिक प्रवास

    सीमा शेख या मुळच्या मादळमोही या गावातील रहिवासी आहेत. वडील पेशाने डॉक्टर आहेत. तर आई गृहिणी आहेत. पहिली ते सहावीपर्यंतचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी लातूरमध्ये प्रवेश घेतला. बीएससीची पदवी संपादन केल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.

    वनअधिकारी परीक्षेत राज्यात अव्वल

    नुकताच एमपीएससीकडून वनसंरक्षक परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये सीमा हिने सर्वोत्तम कामगिरी करत राज्यात मुलींमध्ये अव्वल क्रमांक पटकावला. त्यामुळे ती वनअधिकारी झाली असून शासकीय सेवेत कार्यरत होण्याचे तिचे स्वप्न साकार झाले आहे. सीमा शेख हिने केलेल्या कष्टाचे फळ मिळाल्याने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

    आईला वाचवण्यासाठी मुलीचा रौद्रावतार, हल्ला करणाऱ्या कोल्ह्याचा आवळला गळा, Video

    मामाच्या प्रेरणेतून स्पर्धा परीक्षेची तयारी

    वडील पेशाने डॉक्टर असल्याने मुलीनेही डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. मात्र, मामा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. त्यांच्याकडून वारंवार मार्गदर्शन मिळत होते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेतच यश मिळवून अधिकारी होण्याची इच्छा होती. कुटुंबातील सर्वांच्या प्रोत्साहनामुळे आज हे यश मिळवू शकले, असे सीमा शेख सांगतात.

    First published:
    top videos

      Tags: Beed, Beed news, Local18, MPSC Examination, Success story