बीड, 06 डिसेंबर : थंडीचे दिवस सुरू होताच राज्यामधील अनेक गावं खेड्यांमध्ये जत्रा भरायला सुरुवात होते. अगदी गावखेड्यात देखील धार्मिक महत्त्व असणारे मंदिर आहेत. या मंदिरांना मोठा इतिहास आहे. तसेच काही अनोख्या परंपरा देखील आहेत ज्या अगदी पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत. विशेष म्हणजे या परंपरा आजही जपल्या जात आहेत. बीडमधील योगेश्वरी मंदिराला आराध बसवण्याची परंपरा आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात योगेश्वरी देवस्थान आहे. राज्यातील भाविकांचे हे श्रद्धास्थान असून कोकणवासीयांची कुलदेवता आहे. या शक्तिपीठ योगेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये आराध बसण्याची परंपरा बाराव्या शतकापासून जपली गेली आहे. विशेष म्हणजे राज्यातील हे एकमेव मंदिर आहे ज्या ठिकाणी आराध बसण्याची परंपरा आजही कायम आहे.
Kolhapur : थंडीत माणुसकीची ऊब, 'त्या' मुलांनाही मिळणार स्वेटर्स
मार्गशीर्ष महिन्यात उत्सव
योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाची सांगता झाली आहे. या महोत्सवादरम्यान राज्यासह बाहेरील देखील भाविक दर्शनासाठी येतात. उत्सव काळात येथे जत्रेचे स्वरूप येते. मार्गशीष महोत्सवात भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी आख्यायिका आहे. महोत्सव दरम्यान देवीला साडी, चोळी, माहाआरती केली जाते. गळ्यात कवड्यांची माळ, एका हातात पोत, दुसऱ्या हातात परडी, जोगवा दे ग माय जोगवा या जयघोषात मातेची मनोभावे पूजा केली जाते. मंदिर परिसरातच देवीची भक्ती करण्यासाठी महिला दहा दिवस स्थायिक असतात.
Christmas 2022 : फक्त 50 रुपयांपासून करा ख्रिसमची भन्नाट शॉपिंग, Video
12 व्या शतकातील मंदिर
आराध बसलेल्या महिलेला पूर्णाहुती होम झाल्यानंतर साडी चोळीचा आहेर दिला जातो. महिलेचा सन्मान केला जातो. आराध बसलेल्या महिलांना सन्मान पूरक घरी नेले जाते. यालाच आराध म्हटलं जाते. योगेश्वरी देवीच्या मंदिराचे मुख्य बांधकाम हेमाडपंती आहे. शिलालेखातील उल्लेखावरून मंदिर 12 व्या शतकात यादवांच्या काळात उभारण्यात आल्याचे इतिहासकार सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.