मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Beed : रब्बी पिकावर बुरशीचा हल्ला, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Beed : रब्बी पिकावर बुरशीचा हल्ला, शेतकऱ्यांची चिंता वाढली

हरभरा पिकाचे बुरशीजन्य मर रोगाने मोठे नुकसान होत आहे. 8 टक्के क्षेत्रावर बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

हरभरा पिकाचे बुरशीजन्य मर रोगाने मोठे नुकसान होत आहे. 8 टक्के क्षेत्रावर बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

हरभरा पिकाचे बुरशीजन्य मर रोगाने मोठे नुकसान होत आहे. 8 टक्के क्षेत्रावर बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

बीड, 07 डिसेंबर : शेतकऱ्यांना अनेक संकटांना समोरे जावं लागते. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होते. त्यातच आता रब्बी हंगामातील पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. बीड  जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील हरभरा पिकाचे बुरशीजन्य मर रोगाने मोठे नुकसान होत आहे. 8 टक्के क्षेत्रावर बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

अंबाजोगाई तालुक्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाची पेरणी केली जाते.  तालुक्यात 77 हजार पेरणी योग्य क्षेत्रापैकी 39 हजार हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे म्हणजेच 50 टक्के क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा झालेला आहे. यापैकी 8 टक्के क्षेत्रावर बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. जिल्ह्यात परतीचा पाऊस चांगला झाला. त्यामुळे जमिनीत बऱ्यापैकी ओलावा होता. हरभऱ्याची पेरणी करताना, ज्यांनी बीज प्रक्रिया केली नाही, अशा शेतकऱ्यांना या प्रादुर्भावाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

बुरशीजन्य रोगावर उपाय 

हरभरा पिकावर बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास बायोमिक्स 100 ग्रॅम किंवा कॉर्बन्डजिम 12 टक्के अधिक मॅन्कोजेब 66 टक्के, डब्ल्यू पी 30 ग्रॅम किंवा थायोफिनेट. मिथाईल 70 डब्ल्यू पी 30 ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून रोपाच्या मुंडाजवळ टाकावे, असे आवाहन अंबाजोगाई उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्रज्ञान  शिवप्रसाद येळकर यांनी केले आहे.

Datta Jayanti: 11 हजार दिव्यांनी उजळले मंदिर, भक्तांनी केला दीपोत्सव साजरा,Video

कीड अळीचे व्यवस्थापन कसे कराल

हरभऱ्यावरील घाटेअळीचे पतंग नष्ट करण्यासाठी हेलिल्युर कामगंध सापळे प्रती एकरी 10 लावावेत. घाटेअळीने आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास  सरासरी 1 अळी प्रति मीटर ओळीत आढळून आल्यास  प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. शेतामध्ये एक एकर क्षेत्रासाठी टी आकाराचे दहा पक्षी थांबे उभे करावेत. यावर पक्षी बसून अळ्या वेचून खातील. 

शेतमजुरी करून शिक्षण घेणाऱ्या अक्षयला कशी मिळाली सैन्यात नोकरी? Video

रासायनिक व्यवस्थापनासाठी क्विनालफॉस 20 टक्के प्रवाही 20 मिली किंवा इमामेक्टिन बेंझोएट 5 टक्के 6 ग्रॅम किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5 टक्के प्रवाही 10 मिली प्रति 10 लीटर पाण्यातून फवारणी करावी, असे आवाहन अंबाजोगाई उपविभागीय कृषी कार्यालय यांच्याकडून करण्यात आले आहे.  ज्या शेतकऱ्यांच्या हरभऱ्यावर बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे, त्यांनी वरच्यावर औषधाची फवारणी न करता हरभराच्या मुळाशी फवारणी करावी, जेणेकरून लवकरात लवकर हा प्रादुर्भाव कमी होईल तंत्रज्ञान समन्वयक, उपविभागीय कृषी कार्यालय, अंबाजोगाई शिवप्रसाद येळकर यांनी सांगितले.

First published:

Tags: Beed, Local18