बीड, 31 जानेवारी : ऊसाला वेळेत तोड येत नसल्याची ओरड अनेक शेतकऱ्यांची असते. यासह वाढता खर्च आणि ऊसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना ऊसाची शेती आता नको वाटत आहे. बीडमधील अनेक शेतकरी ऊस उत्पादनासह जोडधंदा सुरू करत आहेत. यातून चांगली कमाई देखील होत आहे. बीडच्या आनंदावाडी परिसरात अनेक शेतकऱ्यांनी रसवंतीचा व्यवसाय थाटला आहे.
उन्हाची तीव्रता वाढली की आपण उसाच्या रसाचे सेवन करतो. प्रत्येक गावामध्ये असे वेगवेगळे ठिकाण असतात की त्या ठिकाणी तिन्ही ऋतूमध्ये थंड पेय आणि उसाचा रस नक्की मिळतो. बीड पासून जवळच असणाऱ्या आनंदवाडी भागात ऊसाचा रस तिन्ही ऋतूमध्ये मिळतो.
बीड शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आनंदवाडी, हे गाव असून या परिसरामध्ये मागील दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून रसवंती गृह असून एक दोन नव्हे तर बारा ते पंधरा रसवंती गृह या परिसरात आहेत. त्यामुळे आता हा परिसर रसवंती गृहाचा हब बनला आहे. या परिसरातून येणारा जाणारा व्यक्ती या ठिकाणी थोड्या वेळ का होईना रस पिण्यासाठी, नक्की थांबतो.
परिसरातच ऊसाची शेती
याच परिसरातून बिंदुसरा नदी वाहते. त्यामुळे या परिसरात उसाचे, उत्पन्न अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे अधिकच चवदार आणि शेतातील गावरान ऊस तोडू लगेच ग्राहकांना ताजा उसाचा रस दिला जातो. त्यामुळे बीड मधील अनेक नागरिक या ठिकाणी आवर्जून रस, पिण्यासाठी येतात.
खडकाळ जमिनीत बहरली हिरवीगार मिरची, दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी झाला लखपती!
900 किलो ऊसाचा रस
ताजा, शुद्ध रसाच्या ग्लासाचा दर हा 10 रुपये असून या ठिकाणी 10 ते 15 रसवंती गृहाच्या माध्यमातून दिवसाकाठी दोन ते अडीच हजार रसाच्या ग्लासची विक्री होते आणि आठशे, ते नऊशे, किलो उसाची गरज रस बनवण्यासाठी असते. त्यामुळे या परिसरातील अनेक लोकांच्या हाताला रोजगार तर उपलब्ध झाला आहे. मात्र शेतकरी देखील रसवंती गृह व्यवसायातून चांगली कमाई करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.