पुणे, 10 मार्च, चंद्रकांत फुंदे : बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. सासूने आपल्याच सुनेच्या मासिक पाळीचं रक्त आघोरी विद्येसाठी एका मांत्रिकाला विकल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. या कामात सासूला दीराने देखील मदत केली असल्याचं समोर आलं आहे. मासिक पाळीचं रक्त मांत्रिकाला पन्नास हजार रुपयांना विकण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑगस्ट 2022 मधील घटना घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बीडमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला लाज आणणारा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. सासू आणि दिराने पीडित महिलेच्या मासिक पाळीचं रक्त जादूटोण्यासाठी मांत्रिकाला विकलं. त्याबदल्यात मात्रिंकाने त्यांना पन्नास हजार रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात 27 वर्षीय तक्रारदार पीडितेनं गुन्हा दाखल केलाय. ही घटना ऑगस्ट 2022 मधील असल्याचं पीडितेनं म्हटलं आहे. प्रकरण बीड पोलिसांकडे वर्ग पीडितेनं दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला ही तिच्या सासरी बीडला गेली होती. तेव्हा तिची सासू आणि दिराने या पीडितेच्या मासिक पाळीच रक्त मांत्रिकाला 50 हजार रुपयांना विकलं. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करून हे प्रकरण बीड पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.