जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बीड : शिंदे गटाच्या मंत्र्याच्या मुलीला मिळाली राष्ट्रवादीकडून उमेदवारी, ठाकरे गटाचा केला पराभव

बीड : शिंदे गटाच्या मंत्र्याच्या मुलीला मिळाली राष्ट्रवादीकडून उमेदवारी, ठाकरे गटाचा केला पराभव

प्रेरणा पंडित

प्रेरणा पंडित

मंगळवारी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागले. यातील अनेक ग्रामपंचायती या तिथे लागलेल्या धक्कादायक निकालामुळे चर्चेत आल्या आहेत.

  • -MIN READ Bid,Bid,Maharashtra
  • Last Updated :

बीड, 21 डिसेंबर : मंगळवारी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागले. यातील अनेक ग्रामपंचायती या तिथे लागलेल्या धक्कादायक निकालामुळे चर्चेत आल्या आहेत. कुठे बँडवाला सरपंच झाल तर कुठे सामान्य भाजी विक्रेत्याच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली. या निकालांची जोरदार चर्चा सुरू असताना, आता गेवराई तालुक्यातील दैठण ग्रामपंचायत देखील एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. मंगळवारी लागलेल्या निकालामध्ये दैठण ग्रामपंचायतीमधून राष्ट्रवादीच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. प्रेरणा प्रताप पंडित या दैठण ग्रामपंचायतीमधून विजयी झाल्या. विशेष म्हणजे प्रेरणा पंडित या मंत्री संदीपान भुमरे यांच्या कन्या आहेत. संदीपान भुमरे यांच्या कन्या   प्रेरणा पंडित यांनी दैठण ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला. ठाकरे गटाकडून शुभांगी निळकंठ पंडित यांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रेरणा पंडित या मंत्री संदीपान भुमरे यांच्या कन्या आहेत. संदीपान भुमरे हे शिंदे गटाचे मंत्री आहेत. शिंदे गटाच्या मंत्र्याच्या मुलीने राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत ठाकरे गटाला पराभवाचा धक्का दिल्यानं ही निवडणूक चर्चेला विषय ठरली आहे. हेही वाचा :  जळगाव : चर्चा तर होणारचना भाऊ! भल्याभल्यांचा बँड वाजवत बँडवाला बनला सरपंच, पॅनलही केलं विजयी निवडणुकीमध्ये चूरस   मंगळवारी दैठण ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार  प्रेरणा प्रताप पंडित यांनी  शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार  शुभांगी निळकंठ पंडित यांचा पराभव केला. ठाकरे गटाच्या उमेदवाराकडून कडवं आव्हान निर्माण करण्यात आल्यानं ही निवडणूक अटितटीची झाली. मात्र प्रेरणा पंडित यांनी शुभांगी निळकंठ पंडित यांचा पराभव करत ठाकरे गटाला धक्का दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात