जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुलगी बेपत्ता, तिचा शोधण्याऐवजी पोलीस वडिलांकडेच मागतायत पैसे; दाद कुणाकडे मागायची?

मुलगी बेपत्ता, तिचा शोधण्याऐवजी पोलीस वडिलांकडेच मागतायत पैसे; दाद कुणाकडे मागायची?

बेपत्ता मुलगी शोधण्यासाठी पोलिसांनी वडिलांकडे मागितले पैसे

बेपत्ता मुलगी शोधण्यासाठी पोलिसांनी वडिलांकडे मागितले पैसे

मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसात धाव घेतली तर पोलिसांच्या अशा वागण्यामुळे दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न मुलीच्या वडिलांना पडला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

बीड, 20 मे : राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुली बेपत्ता झाल्याच्या घटनांची नोंद झालीय. तीन महिन्यात साडे तीन हजारांहून अधिक तरुणी बेपत्ता झाल्या असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली. दरम्यान, आता बीडमधून धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे. बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पॉकेट मनी म्हणून 25 हजार रुपयांची मागणी आई-वडिलांकडे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांकडून पैसे मागितले जात असल्याची तक्रार वडिलांनी आता थेट पोलीस अधीक्षकांकडे केलीय. बीडमधील नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये ही घटना घडली आहे. बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी चक्क पालकांकडेच पैसे मागितल्याने संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनात माणुसकी उरलीय की नाही असा प्रश्न विचारला जात आहे. घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला आहे. आता वेगवेगळ्या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही फूटेजचा तपास केला जात आहे.

News18लोकमत
News18लोकमत

महिलेचे पाय कापून निर्घृण हत्या, 7 वर्षांनी आरोपीला कोर्टानं सुनावली शिक्षा   मुलगी बेपत्ता असल्यानं तिच्या शोधासाठी वडील पोलिस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्यांना धक्काच बसला. एकीकडे मुलीच्या काळजीने चिंताग्रस्त असलेल्या वडिलांकडेच पोलिसांनी पैसे मागितली. याची तक्रार मुलीचे वडील दत्ता खराडे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केलीय. तसंच नेकनूर पोलिसांनी २५ हजार रुपये आपल्याकडून घेतल्याचा आरोप खराडे यांनी तक्रारीत केलाय. याशिवाय तपास करण्यासाठी पोलिसांनी वडिलांनाच तुम्ही स्वत: चारचाकी गाडी घेऊन या असं सांगितल्याचंही त्यांनी म्हटलं. मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसात धाव घेतली तर पोलिसांच्या अशा वागण्यामुळे दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न मुलीच्या वडिलांना पडला आहे. नेकनूर पोलिसांनी माणुसकी विकली का? कुंपणच शेत खाणार असेल तर नेमकं जायचं कोणाकडे असा हतबल प्रश्न मुलीच्या वडिलांनी विचारला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: beed
  • First Published :
जाहिरात
जाहिरात