बीड, 27 सप्टेंबर : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलं तरीही मला संपू शकत नाहीत जर मी तुमच्या मनात असेल तर असं म्हणत पंकजा मुंडे यांनी थेट मोदींना आव्हान दिले आहे. बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथे आयोजित "समाजातील बुद्धिजिवी लोकांच्या सोबत संवाद" या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की मोदींना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे, मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. पण मला कोणी संपवू शकत नाही, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे.
काय आहे घटना?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवडा निमित्त बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथे आयोजित "समाजातील बुद्धिजिवी लोकांच्या सोबत संवाद" या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शन म्हणून भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे तर खा प्रीतम मुंडे यांची विशेष उपस्थिती होती. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण सुरू आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. त्याचा अर्थ असा नाही की, म्हणत पंकजा मुंडे यांनी एक क्षण विचार केला आणि यामध्ये मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मला कोणी संपवू शकतं नाही. पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तरी ते मला संपवू शकत नाहीत. जर मी तुमच्या मनावर राज्य केले तर, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. यानंतर आता पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.
...तर मोदीजीही मला संपवू शकणार नाही, असं का म्हणाल्या पंकजा मुंडे? #BJP #pankajamundhe pic.twitter.com/A2yH1nA5KJ
— News18Lokmat (@News18lokmat) September 27, 2022
पंकजा मुंडे यांना डावललं जात असल्याची कार्यकर्त्यांची भावना
नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. मात्र, त्यांचा सरकारमध्ये समावेश न झाल्याने कार्यकर्तेही नाराज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बीड येथील भाजपच्या महिला आघाडीने पदयात्रा करत मोहटा देवी गडावर येऊन देवीला साकडं घातलं होतं. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांना मंत्रीपद मिळावं, अशी अपेक्षा बीड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pankaj munde, Pm modi