मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Beed : आदिशक्तीच्या सुंदर मूर्तींनी बाजारपेठ सजली!, पाहा Video

Beed : आदिशक्तीच्या सुंदर मूर्तींनी बाजारपेठ सजली!, पाहा Video

X
नवरात्र

नवरात्र हा भारतातील सर्वात महत्वाचा आणि शुभ सण आहे. या उत्सवासाठी शहरातील बाजारपेठ सज्ज झाली आहे.

नवरात्र हा भारतातील सर्वात महत्वाचा आणि शुभ सण आहे. या उत्सवासाठी शहरातील बाजारपेठ सज्ज झाली आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Bid (Beed), India

  बीड, 24 सप्टेंबर : बाप्पाला निरोप दिल्यानंतर आता नवरात्राेत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. शहरातील बाजारपेठा उत्सवासाठी सज्ज झाल्या आहेत. बाजारात आदिशक्तीच्या अनेक रूपातील सुंदर मूर्ती दाखल झाल्या आहेत. देवीच्या वेगवेगळ्या रूपातील आकर्षक मूर्ती, सजावट साहित्याने बाजार फुलून गेला आहे.

  नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा कोरोनाचे सावट दूर झाल्याने उत्सवावरील निर्बंध शासनाने हटवले आहेत. बीडच्या बाजारामध्ये नवनवीन आकर्षित मूर्ती दाखल झाल्या आहेत. या मूर्ती भाविकांची मन आकर्षित करून घेत आहेत. नुकतीच गणेशोत्सवाची धामधूम संपली आहे. गणेशभक्त निवांत झाले असले तरी लवकरच नवरात्रोत्सव सुरू होणार आहे. दुर्गादेवीचे भक्त तयारीला लागले आहेत. पितृ पंधरवड्यानंतर घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतो. घटस्थापनेसोबतच दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

  यंदा नवनवीन मूर्ती

  दरवर्षी बाजारपेठेमध्ये नवनवीन रंग सजावटीच्या मूर्ती भक्तांना आकर्षित करत असतात. दुर्गा माता, वैष्णव देवी, तुळजापूरची देवी, अशा वेगवेगळ्या अवतारातील देवींच्या मूर्ती बाजारात विक्रीसाठी आहेत. यंदा काही नवीन पॅटर्नच्या मूर्ती देखील दाखल झाल्या असून भक्तांना आकर्षित करीत आहेत.

  Navratri 2022: नवरात्रीत दिशेशी संबंधित या चुका करू नका, पूजा करताना हे नियम पाळा

  मूर्तिकारांची कसब

  मूर्तीचे फिनिशिंग, रंगरंगोटी, सुशोभीकरण, अलंकार चढवणे, कुंदण, मोतीकाम यासाठी बराच वेळ जातो. मूर्तिकार आपली कसब अजमावून आकर्षक मूर्ती साकारत असतात. नवरात्रीनिमित्त रात्रंदिवस काम करून मूर्ती विक्रीसाठी सज्ज केल्या जातात. तीन दिवसात घटस्थापना होणार आहे. बाजारपेठेत मूर्ती विक्रीचे स्टॉल लावण्यात आले असून खरेदीसाठी गर्दी वाढत आहे.

  Video : नवरात्रोत्सवाची लगबग सुरू, देवीच्या मूर्ती 25 टक्क्यांनी महाग

  25 टक्क्यांनी किमती वाढल्या 

  चमकी आणि वेलवेटच्या रंगातील मूर्ती, साडी नेसलेल्या मूर्तीला ग्राहकांची मोठी मागणी आहे. मूर्तीच्या किमतीत वाढ झाली आहे. मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे कच्चे सामान, रंग, व मजुरीचा दर वाढल्याने यंदा मूर्तीचे भाव तब्बल 20 ते 25 टक्क्यांनी वाढले असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.

  First published:

  Tags: Beed, Beed news, Navratri, बीड