मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लहान मुलांकडे थोडंस दुर्लक्ष अन्; खेळता खेळता 4 वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू, पवार कुटुंब हादरलं!

लहान मुलांकडे थोडंस दुर्लक्ष अन्; खेळता खेळता 4 वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू, पवार कुटुंब हादरलं!

लहान मुलांकडे थोडसं दुर्लक्ष अन् अनर्थ घडला.

लहान मुलांकडे थोडसं दुर्लक्ष अन् अनर्थ घडला.

लहान मुलांकडे थोडसं दुर्लक्ष अन् अनर्थ घडला.

  • Published by:  Meenal Gangurde
बीड, 25 ऑगस्ट : खेळता खेळता घरातील चिमुरडीचा जीव जाईल, असा कोणी विचारही केला नव्हता. खेळताना तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. मात्र काही मिनिटात हा आनंद दु:खात परिवर्तीत झाला. आज सकाळी परळी-गंगाखेड रस्त्यावर ही घटना घडली. येथे औष्णिक विद्यूत केंद्राची राख साठवणुकीची तळं आहे. या ठिकाणी साचलेल्या पाण्याच्या एका डबक्यात पडून साक्षी या 4 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. पवार कुटुंबीय राखेच्या तळ्यापासून साधारण 100 मीटर अंतरावर राहत होतं. पवार कुटुंबातील 3 भावंड खेळता खेळता राखेच्या तलावात साचलेल्या डबक्याच्या पाण्यात गेले. यावेळी साक्षी आणि तिची दुसरी बहिणी पाण्याच्या डबक्यात खेळत होते. परळी गंगाखेड रस्त्यावरील पांडे पेट्रोल पंपाच्या मागे पवार कुटुंब राहत होते. Aurangabad Accident News : डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगलेल्या दोन जिवलग मित्रांवर काळाचा घाला, पालक झोपेत असतानाच मुलांच्या मृत्यूची बातमी कानावर खेळता खेळता साक्षी तळ्यात गेली. यातच ती पाण्याच्या डबक्यात पडली. यानंतर तिला लहान भाऊ घाबरला. त्याने आई-वडिलांना बोलवण्यासाठी घरी धाव घेतली. मात्र कोणी मदतीला येईल, त्याआधीच अनर्थ घडला होता. साक्षीचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर कुटुंबावर डोंगर कोसळला आहे.
First published:

Tags: Beed news, Crime news

पुढील बातम्या