औरंगाबाद, 04 ऑगस्ट : गंगापूर आणि मांजरी गावातील दाेन जिवलग मित्रांचा भीषण अपघात झाला. या अपघातात दाेघांचाही मृत्यू झाल्याने गंगापूर आणि मांजरी गावावर शाेककळा पसरली आहे. या दुर्घटनेपूर्वी दाेन्ही मित्र काॅलेजला निघाले हाेते. त्यांच्या माेटार सायकलची आणि ट्रकची धडक झाल्याने दाेघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दरम्यान दोघे एकाच वर्गात शिकत होते नीट क्लासला जाताना हा अपघात झाला. जिवलग मित्रांचा अपघातात मृत्यू झाल्याने दोघांच्याही घरावर मोठे दु:ख कोसळले आहे. (Aurangabad Accident News)
मिळालेल्या माहितीनुसार नीट क्लाससाठी औरंगाबादला निघालेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची भरधाव दुचाकी ट्रकला पाठीमागून धडकली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. भेंडाळा फाट्याजवळ बुधवारी सकाळी हा भीषण अपघात झाला. यश नयन शेंगुळे (19) व आदित्य रामनाथ सुंब (19) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे दोघेही गंगापूर तालुक्याचे रहिवासी होते. अपघाताची माहिती समजताच दोघांच्या गावावर मोठी शोककळा पसरली आहे.
हे ही वाचा : सावधान! घरातील पेस्ट कंट्रोलने घेतला 6 वर्षीय मुलीचा जीव; आई-वडीलही रुग्णालयात दाखल
यश व आदित्य हे दोघे वर्गमित्र होते. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी 'नीट'च्या रिपीट बॅचमध्ये तयारीसाठी त्यांनी औरंगाबादला क्लास लावला होता. पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास ते दुचाकीवर (एमएच-20-ईएक्स-6048) निघाले. सकाळी पावणेसहाच्या सुमारास औरंगाबादकडे जाणाऱ्या ट्रकला (केए-56- 4123) पाठीमागून त्यांची दुचाकी धडकली. यात दोघांच्या डोक्यास गंभीर इजा झाली होती यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा : अमरावतीच्या मेळघाटात भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी
या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पाेहचले. त्यांनी रुग्णवाहिकेत चालक सागर शेजवळ व नागरिकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवुन दिले. तसेच अपघातग्रस्त ट्रक बसस्थानक परिसरात नेला. औरंगाबाद पुणे महामार्गावरील भेंडाळाफाट्याजवळून आदित्य आणि यश हे दाेघे मोटार सायकलवरून औरंगाबादला महाविद्यालयात जात असताना नाशिकहून हैद्राबादला जाणाऱ्या ट्रकशी त्यांची धडक झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Ahmednagar-Aurangabad Highway, Aurangabad, Aurangabad News