रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 25 फेब्रुवारी: शेतकऱ्यांना शेतातून अधिक उत्पादन घेण्यासाठी चांगल्या प्रतीच्या खतांचा वापर करावा लागतो. सध्या महागाईच्या काळात खतांच्या किमती वाढल्या आहेत. युरिया, डीएपी सारखी खते पिकाला मातीतून दिली गेल्याने खत वाया जाण्याची शक्यताही अधिक असते. परंतु, आता यावर एक चांगला पर्याय बाजारात आला असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. बीड जिल्ह्यातील खतांच्या दुकानात नॅनो युरिया आणि द्रवरुप डीएपी खते मिळत आहेत. नॅनो टेक्नॉलॉजीद्वारे द्रवरुप खतांची निर्मिती बाजारात सर्वाधिक मागणी असलेले युरिया आणि ‘डीएपी’चे नॅनो टेक्नॉलॉजी द्वारे निर्माण केलेले द्रवरूप खत बाजारात उपलब्ध होत आहे. यातील युरिया सध्या उपलब्ध आहे तर डीएपी अवघ्या काही महिन्यात बाजारपेठेत येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खतावरील खर्च कमी होण्याबरोबरच पाणी व हवेचे प्रदूषण टाळले जाणार आहे. विशेष म्हणजे या खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारणार आहे.
शेतकऱ्यांना फायदा गत काही काळापासून कृषी उत्पादनासाठी लागणारा खर्च वाढतच आहे. तर दुसरीकडे उत्पादन मालाच्या विक्रीत चांगला दर नसल्याने शेतकरी कर्जाच्या ओझ्या खाली दबला आहे. शेती उत्पादनासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या खताच्या किमतीही सातत्याने वाढत आहेत. आता द्रवरुप खत थेट पिकांवर फवारल्यामुळे खताचा अपव्यय कमी होणार आहे. तर पिकासाठी अधिक फायदा होणार आहे. त्यामुळे खत कमी लागेल आणि खतासाठी खर्चही कमी येणार आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! ‘या’ कारणांमुळे वाढणार भाव प्रदुषणाला आळा रासायनिक खत हे गरजेपेक्षा अधिक वापरल्याने खर्च वाढतो. पाणी आणि हवेचे प्रदूषण होते. तसेच जमिनी नापीक झाल्याच्या घटनाही घडतात. या सर्वांवर द्रवरुप खत हा क्रांतिकारी पर्याय ठरणार आहे. खत अधिक प्रमाणात मातीत मिसळत नसल्याने नापिकीची समस्या निर्माण होणार नाही. तसेच पाणी, हवा प्रदुषणालही काही प्रमाणात आळा बसेल. शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! तुरीच्या भावात झाली मोठी वाढ, पाहा काय आहेत दर 45 किलो गोणीऐवजी 500 मिली बॉटल पुरेशी नॅनो युरिया बाजारपेठेमध्ये उपलब्ध झाला आहे. 45 किलोच्या गोणी ऐवजी केवळ 500 मिली बॉटल पुरेशी ठरणार आहे. सध्या 266 रुपयांच्या 45 किलो युरिया अर्धा एकर शेतामध्ये पिकाांच्या मुळाशी टाकला जातो. तर 225 रुपयांना 500 मिलीची बॉटल मिळणारा नॅनो युरियात एक एकर शेतामध्ये फवारणी होणार आहे. अर्थात शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे. त्यामुळे द्रवरुप नॅनो युरियाला शेतकऱ्यांकडून मागणी वाढत आहे.

)







