रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 14 फेब्रुवारी: अनेकदा पावसाळ्याच्या ऋतूमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते. तर कधी शहरांमध्ये इतर नैसर्गिक आपत्तीही ओढावत असते. कोणत्याही आपत्तीच्या काळामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभाग नेहमी सतर्क असतो. या काळात आपत्तीग्रस्तांसाठी तात्काळ निवारा निर्माण करण्याची गरज असते. आता ही गरज अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे पूर्ण होणार आहे. बीडच्या आपत्ती व्यवस्थापन ताफ्यात दहा मिनिटात तयार होणारे टेंट दाखल झाले आहेत.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे टेंट सध्या आपत्ती व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. आपत्तीग्रस्तांच्या सेवेसाठी व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यात नवनवीन गोष्टी दाखल होत असतात. आता बीडच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे 2 अत्याधुनिक टेंट हाऊस दाखल झाले आहेत. याच टेन्ट हाऊसचे प्रात्यक्षिक नुकतेच कर्मचारी आणि नागरिकांना बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देण्यात आले. जय जवान! ‘या’ हॉटेलमध्ये मिळते आजी-माजी सैनिकांना मोफत जेवण दहा मिनिटात निवारा तयार अत्याधुनिक टेंट हाऊसमुळे आपत्तीच्या काळात नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी ठेवता येणार आहे. हा टेंट पाऊस आणि उन्हापासून बचाव करतो. ज्या ठिकाणी विजेची सुविधा असेल तिथे हवेच्या माध्यमातून हे टेन्ट हाऊस लगेच तयार होते. सात ते दहा मिनिटांमध्ये आपत्तीच्या निवारा तयार होतो. तर जिथे विजेची सुविधा नाही अशा ठिकाणी छोट्याशा बॅटरीच्या आधारेही हा टेंट उभा करता येतो. त्यामध्ये वीस ते पंचवीस नागरिक सहज बसू शकतात. शेतकऱ्यांचा कापूस घरातच; बीडचा शेतकरी पुन्हा संकटात आपत्तीच्या काळात होणार वापर या टेंट हाऊसला कशा पद्धतीने उभे केले जावे यासाठीचे आमचे ट्रेनिंग पूर्ण झाले आहे. भविष्यात महापूर किंवा इतर कोणतीही आपत्ती ओढावली तर त्या काळामध्ये टेंटचा वापर होणार आहे, अशी माहिती अग्निशामक दल प्रमुख भागवत घायतिडक यांनी दिली.