रोहित देशपांडे, प्रतिनिधी
बीड, 14 फेब्रुवारी: देशाचं सार्वभौमत्व आणि संरक्षण यात भारतीय सैन्याचं मोठं योगदान आहे. असीम देशभक्तीचं उदाहरण म्हणून जवानांकडे पाहिले जाते. या जवानांच्या त्यागाला सलाम करत बीडमधील शिरुर कासारच्या एका हॉटेलवाल्याने एक अनोखा संकल्प केला आहे. भागवत थोरात यांनी सर्व आजी माजी सैनिकांना मोफत नाष्टा आणि जेवण देण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या या देशभक्तीचे कौतुक होत आहे.
शिरुरमध्ये नाष्टा हाऊस
शिरूर कासार येथे बस स्टॅन्ड परिसरातील मुख्य चौकात वेताळ नाष्टा हाऊस आहे. गेल्या काही वर्षांपासून भागवत थोरात हे हॉटेल चालवतात. चवदार आणि चविष्ट पदार्थांसाठी त्यांची ख्याती आहे. देशासाठी आणि समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्यांनी जवानांना मोफत नाष्टा देण्याचा निर्णय घेतला.
ग्रामीण भागात वाचन संस्कृतीचा प्रसार करणारे बीडचे डॉक्टर गुरूजी, Video
पंचक्रोशीतील जवान घेताहेत लाभ
थोरात यांच्या हॉटेलमध्ये शिरुर कासार पंचक्रोशीतील आजी माजी जवान येत असतात. तसेच शेजारी असणाऱ्या नगर जिल्ह्यातील नागरिकही येतात. त्यांच्या हॉटेलमध्ये आतापर्यंत 50 हून अधिक जवान येऊन गेले आहेत. त्याचा थोरात यांना अभिमान वाटतो. "आजी आणि माजी सैनिकांची माझ्या हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून सेवा करता येते हीच माझी देशसेवा आहे. त्यामुळे या उपक्रमाला मी सुरुवात केली आहे," असे हॉटेल चालक भागवत थोरात म्हणतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Beed news, Indian army, Local18