सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड, 3 जून : मला जर भुमिका घ्यायची असेल तर असेच माध्यमांना बोलावून छातीठोकपणे बिंदास्त भुमिका घेईल. कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून बंदूक चालवणारे खांदे अजून तरी मला मिळाले नाहीत. मात्र, माझ्या खांद्याची रुंदी एवढी आहे की अनेक बंदुका माझ्या खांद्यावर विसवायचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना मी विसवू देणार नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी स्वपक्षाला इशारा दिला आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या 9व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे अनेक लोक निवडणुकांमध्ये हारले पण त्यांना संधी दिली गेली. कदाचित 2 डझनभर आमदार-खासदार झाले. गेल्या चार वर्षात मी मात्र बसत नसेल तर लोक चर्चा करणार. ही चर्चा मी ओढवलेली नाही. माझ्या मनात गाढ विश्वास आहे. माझे नेते अमित शाह आहेत. त्यांची भेट घेणार आहे. त्यांना वेळ मागितला आहे. त्यांना मी विचारणार आता माझे वडील जिवंत नाही. माझं नेतृत्व करावं असा व्यक्ती सापडला. त्यांच्याशी मी बोलणार आहे. हितचिंतक खूप आहेत. सगळ्याच पक्षात आहेत आणि दुसऱ्याही पक्षात आहेत. मी दररोज रडगाणं गाणारी नाही. बाप मेला तरी माझ्या डोळ्यात अश्रू येवू दिले नाही, अस पंकजा मुंडे म्हणाल्या. 19 वर्षांपासून मी राजकरणात आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षांत खूप अनोखे अनुभव आले. माझ्या मनात सतत शंका आली की माझ्या बोलण्याचे अर्थ वेगळे निघतील. गोपीनाथ मुंडे यांना अपेक्षित राजकारण करू शकणार नाही. ज्या दिवशी मी समोरच्या माणसाला आवडणार नाही, असे बोलणार नाही त्या दिवशी मला राजकारण करण्याचा अधिकार राहणार नाही. म्हणून आज माझ्या पाठीमागे मीडिया आहे. मी त्यांचे आभार मानणार आहे. माझ्या माणसापर्यंत मीडिया योग्यच पोहोचवते. मी माझी भूमिका हजार वेळा मांडली. परत भुमिका मांडवी असे माझे लेचेपेचे शब्द नाहीत. माझे शब्द ठाम आहेत. रामाने सोडलेला बाण परत येत नसतो तसे माझे शब्द आहेत. शब्द गोल फिरवायचे नाही. वाचा - Pankaja Munde : लहान माणसांकडून काय अपेक्षा करणार? पंकजा मुंडे यांचा रोख कुणाकडे? गोपीनाथ गडावरुन इशारा मी राजकारणात आहे ते केवळ आणि केवळ लोकांसाठी आहे. मी माझ्या परिवाराचं भलं करण्यासाठी नाही. मी माझ्या स्वतःच्या कुठल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नाही. मी लोकांसाठी आहे. माझ्या जीवनात नेहमी भूमिका घेतली आहे. लोक म्हणजे माझ्या आजूबाजूचे असणारे कार्यकर्ते नाही. जो माझ्याकडे बघतोय त्याचं हित मला दिसते. त्याच्यासाठी माझी भूमिका असणार आहे. नामांतराची चळवळ, ओबीसी आरक्षणाची चळवळ या पक्षाच्या भूमिका नसताही मुंडे साहेबांनी यात स्वतःची आपली भूमिका घेतली होती. मराठा आरक्षण देण्यासाठी मुंडे साहेबांनी जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळं भुमिका या समाज हिताच्या घ्यायच्या असतात. कुणाला आवडेल त्या भूमिका घेणारी व्यक्ती एखादेवेळी आमदारकी खासदारकी राज्यमंत्री मंत्रीपद घेऊ शकतो पण तो नेता होऊ शकत नाही. पंकजा मुंडे जी भूमिका घेईल ती छातीठोक पणे घेईल. आणि आज 3 जून 2023 पर्यंत ज्या भूमिका मांडल्या त्याच्याशी प्रामाणिक राहील, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.