मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भरदिवसा कुऱ्हाडीचा वार, बायकोला संपवून नवरा थेट पोलीस ठाण्यात पोहोचला, बीड हादरलं!

भरदिवसा कुऱ्हाडीचा वार, बायकोला संपवून नवरा थेट पोलीस ठाण्यात पोहोचला, बीड हादरलं!

घटनास्थळी आलेले पोलीस

घटनास्थळी आलेले पोलीस

पती आणि पत्नीचे नाते सात जन्माचे असते. मात्र, बीडमधून एक भयानक घटना समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid, India

बीड, 7 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. तसेच बीडमध्येही गुन्हेगाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता बीडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुऱ्हाडीने वार करुन पत्नीची हत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तसेच पत्नीची हत्या करुन पती पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर झाला.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

बीडच्या ढाकेफळ गावातील हा धक्कादायक प्रकार आहे. पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. तसेच पत्नीची हत्या केल्यावर पती पोलीस स्टेशन मध्ये स्वतः हजर झाला आणि घटनेची कबुली दिली. बीडच्या ढाकेफळ गावातील चौसा वस्तीवर घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.

आरती भगवान थोरात (वय 27 वर्ष ) असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी दुपारी 3 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास वस्तीवरच पती भगवान शाहूराव थोरात याने पत्नी आरती थोरात हिच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून तिला ठार केले. तसेच यानंतर पती भगवान थोरात हा स्वतः युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात पोहोचला आणि घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली.

यानंतर पोलिसांनी आरोपी पती शाहूराव थोरात याला अटक केली आहे. अद्याप या खूनामागील कारण समोर आले नाही. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. मात्र, पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याच्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. तसेच गेल्या काही दिवसांत घडलेल्या गुन्ह्याच्या घटनांवरुन कायद्याचा धाक राहिला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

First published:

Tags: Beed, Beed news, Crime news, Murder, Wife, Wife and husband