रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 30 मे: सार्वजनिक आणि खाजगी ठिकाणी झाडे लावायचे फार मोठे महत्त्व आहे. देशभरामध्ये शासन स्तरावरून दरवर्षी करोडो रुपये झाडे लागवडीसाठी खर्च केले जातात. मात्र सध्याच्या विकासाच्या काळामध्ये अनेकदा झाडांची तोडणी देखील केली जाते. आता बीड जिल्ह्यातील नगर रस्त्यावरील एक दोन नव्हे तर तब्बल 372 झाडांचा रस्ता रुंदीकरणामुळे बळी जाणार आहे. रस्ता रुंदीकरणासाठी हिरवा कंदील बीड - नगर या रस्त्यावर दिवस रात्र मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. पुण्याला जाणं असो की मुंबईला सर्वाधिक बीड जिल्हावासिय मागील अनेक वर्षांपासून याच राज्य महामार्गाचा वापर करत आलेले आहेत. मात्र मागील दीड वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था झाली होती. हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी अनेकदा आंदोलन देखील झाली. मात्र त्यानंतर राज्य शासनाने या रस्ता रुंदीकरणासाठी आता हिरवा कंदील दाखवलाय.
मोठ्या प्रमाणात वृक्षतोड या रस्त्याच्या रुंदीकरण दरम्यान बीड नगर रस्त्यावरील दूर्मिळ झाडे तोडली जाणार आहेत. नगर रोडच्या रुंदीकरणाचे काम काही दिवसात सुरू होणारा असून यात नवगण राजुरी फाट्या नजदीक गर्द सावली देणाऱ्या वडांच्या झाडावरही पहिली कुराड चालवली जाणार आहे. शिरापूर फाटा ते जरूड फाट्यापर्यंत 372 झाडांचा रस्ता रुंदीकरणामुळे बळी जाणारे आहे. असं होणार रस्ता रुंदीकरण काही दिवसातच या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होणे अपेक्षित असून यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चराटा पाट्यादरम्यान दोन्ही बाजूंनी 12 मीटर रस्ता होणार आहे. यामध्ये 10 मीटर काँक्रीट असून 2 मीटर डांबरी रस्ता होणार आहे. तसेच ड्रेनेजही केले जाणार असून त्यावरील स्लॅबचा फुटपाथ म्हणून वापर होऊ शकेल. चर्होटा फाट्यापासून पुढे हा रस्ता 7 मीटर असून नुतीकरणानंतर 10 मीटर होणार आहे. वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेल्या या रोडचे नुतनीकरण व सुसज्ज असे रुंदीकरण होणार असल्याने सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त केले जाते. Solapur News: अशक्य काहीच नाही! सासू आणि सूनेनं एकत्र येऊन खडकाळ जमिनीतून कमावले 30 लाख! Video पर्यावरण प्रेमींचे म्हणणे काय ? पर्यावरण प्रेमी शिवराम घोडके यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, रस्त्यावरून नेहमी प्रवास करणाऱ्यांचे अगदी घनिष्ठ मित्र झालेले प्रसिद्ध अशी वडाची झाडे मात्र रुंदी कारणामुळे तोडावी लागणार आहेत. नगर बीड या राज्य महामार्ग वरील 372 झाडांची तोडणी झाल्यानंतर 744 झाडे पुन्हा लावणार आहेत. मात्र यामधील शंभर वर्षांपेक्षा अधिक महा वटवृक्ष लावणे शक्य नाही. कारण हा वृक्ष वाढायला एक मोठा कालावधी लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाने या झाडांचे रिप्लांटेशन करने गरजेचे आहे. जेणेकरून हे घनदाट सावली देणारे वृक्ष लवकर वाढीस येऊन पुन्हा एकदा गर्द सावली देतील.