जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कमी खर्चात लाखोंचा नफा; भरघोस उत्पन्न देणाऱ्या पेरू शेतीचे लागवड तंत्र

कमी खर्चात लाखोंचा नफा; भरघोस उत्पन्न देणाऱ्या पेरू शेतीचे लागवड तंत्र

कमी खर्चात लाखोंचा नफा; भरघोस उत्पन्न देणाऱ्या पेरू शेतीचे लागवड तंत्र

कमी खर्चात लाखोंचा नफा; भरघोस उत्पन्न देणाऱ्या पेरू शेतीचे लागवड तंत्र

कोरडवाहू शेतकऱ्यांना कमी खर्चात भरघोस उत्पन्न देणाऱ्या पेरूच्या शेतीचा चांगला पर्याय उपलब्ध आहे. पाहा कशी करावी पेरूची शेती..

  • -MIN READ Bid,Bid,Maharashtra
  • Last Updated :

बीड, 19 जुलै: कोरडवाहू शेतकऱ्यांसमोर अनेकदा कुठल्या पिकाची लागवड करावी असा प्रश्न असतो. पाण्याची कमतरता असल्यामुळे जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांची लागवड ते करू शकत नाहीत. मात्र कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या फळझाडांची शेती आज अनेक शेतकरी करताना दिसतात. यातच पेरूची शेती करणे देखील अगदी सोपे असून कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन हवे आहे तर तुम्हीही पेरूची लागवड करू शकता. याबाबत बीडमधील कृषी अभ्यासक रामेश्वर चांडक यांनी दिली आहे. शेतकऱ्यांचा फळबाग लागवडीकडे कल सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा फळबागांच्या शेतीकडे कल वाढत आहे. आंबाड, चिकू, मोसंबी, डाळिंब, यासह विविध फळांची शेती करणारे शेतकरी आपल्याला दिसून येतात. ग्रामीण भागात बहुतांश शेतकऱ्यांना फळ शेती करायची असते मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे त्यांनी केलेली फळ शेतीतून त्यांना अनेकदा नुकसान होते. त्यासाठीच कमी खर्चात भरघोस उत्पन्न देणारी पेरूची शेती कशी करावी? याबाबत आपण माहिती घेणार आहोत.

News18लोकमत
News18लोकमत

कशी करावी पेरूची शेती? पेरूची लागवड नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना वगळता वर्षातील दहा महिने कधीही करू शकता. जमिनीची आखणी करून 6×6 मी अंतरावर 60×60×60 सेमी आकाराचे खड्डे घ्यावेत. हे खड्डे भरताना 15 ते 20 किलो चांगले कुजलेले शेणखत 500 ग्राम, सिंगल सुपर फॉस्फेट 5 ग्राम, फोलिडोल पावडर आणि माती यांच्या मिश्रणाने खड्डे भरून घ्यावेत आणि त्यात रोपांची लागवड करावी. जवळपास 1 एकर मध्ये 2 हजार झाडांची लागवड देखील होते. पेरू लागवडीसाठी हवामान पेरू बागेसाठी उष्ण आणि कोरडे हवामान अनुकूल मानले जाते. त्याच्या आदर्श उत्पादनासाठी 15 ते 30 सेल्सिअस तापमान योग्य मानले जाते. पेरूचे झाड कोरडे हवामान सहज सहन करते. पेरूचे रोप अगदी सहज तयार करता येते आणि हवामानातील चढ - उतारांचा त्यावर फारसा परिणाम होत नाही. ज्या ठिकाणी पाण्याची अत्यंत कमतरता आहे त्या ठिकाणी देखील हे पेरूचे पीक व्यवस्थित येते. झेंडूच्या फुलांची शेती कशी कराल? कृषी तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती Video पेरूच्या सुधारित जाती लखनऊ 49 - पेरूची संपूर्ण भारतात उत्पादित होणारी ही एक प्रगत आणि सुधारित जात आहे. या जातीचे झाडे आकाराने लहान असतात. या जातीचा पेरू मात्र खूपच गोड असतो. साहजिकच बाजारात याला मोठी मागणी आहे. या जातीच्या एका पेरूच्या झाडापासून जवळपास 155 किलो पर्यंतचे उत्पादन मिळू शकते असा दावा केला जातो. पिंक तैवाण पेरू -बाजारात सध्या ग्राहकांची आणि व्यापारी वर्गाची जास्तीत जास्त मागणी असलेला पेरू म्हणजे पिंक तैवान पेरू. साधारणपणे या पेरुचे वजन 500 ग्राम असते. हा पेरू आकाराने मोठा असतो. या पेरुचे वैशिष्ट्य म्हणजे आत मधून हा फिकट गुलाबी रंगाचा असतो जो चवीला एकदम गोड आणि रुचकर असतो. लाल पेरू - या जातीच्या आकाराची फळे मध्यम आकाराची असतात. उत्तर कोकण आणि मुंबईच्या भागात ही पेरूची जात आढळते. या जातीच्या फळाचा गर कडक असतो. Agriculture News: मोसंबीची शेती खरंच नफा देते का? कसं करायचं नियोजन? पेरूवरील कीड, रोग नियंत्रण शेंड अळीच्या नियंत्रणासाठी दोन मिली क्‍लोरपारिफॉस प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. देवी रोग नियंत्रण : ढगाळ वातावरणात देवी रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. नियंत्रणासाठी बोर्डोमिश्रण (0.6 टक्के) फवारणी करावी. यासाठी 100 लिटर पाण्यात 600 ग्रॅम मोरचूद मिसळावे. त्याचा सामू सातपर्यंत करण्यासाठी 350 ग्रॅम कळीचा चुना मिसळावा. त्यानंतर आठ दिवसांनी स्ट्रेप्टोसायक्‍लीन 25 ग्रॅम आणि कॅपटाफ 250 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात