बीड, 18 जुलै : झेंडू फुलांना सणसमारंभात चांगली मागणी असते. त्यामुळे बाजारपेठेत झेंडूंच्या फुलांना मोठी मागणी आहे. यामुळे अनेक शेतकरी आता पारंपारिक शेती न करता फुल शेती करण्याला प्राधान्य देत आहेत. यामध्ये झेंडूच्या फुलाची शेती करणे अतिशय सोपी आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना या फुल शेती विषयी अधिक माहिती नसते. त्याची लागवड कुठल्या हंगामात करावी? त्याच्या लागवडीचे तंत्र काय? खत व्यवस्थापन कशाप्रकारे असलं पाहिजे यासह कुठलाही रोगाचा किंवा किड्याचा प्रादुर्भाव झेंडूंच्या फुलावर होऊ नये त्यासाठी काय उपाय योजना कराव्यात याबद्दल बीडमधील कृषी तज्ज्ञ रामेश्वर चांडक यांनी माहिती दिली आहे. कशी करावी झेंडूची लागवड? झेंडूमध्ये संकरित झेंडू आणि कलकत्ता झेंडू या दोन प्रकारच्या झेंडूची लागवड तुम्ही करू शकतात. कलकत्ता झेंडूची रोपे कमी पैशात मिळतात. इंका सीरीज किंवा इतर जातीचे जे झेंडू ज्यामध्ये पिवळा, केशरी, सोनेरी पिवळा, याची लागवड तुम्ही करू शकतात. ही लागवड करताना 6 फुटावर बेड तयार करून घ्यावेत. यामध्ये मल्चिंग पेपरचा वापर करावा.
झेंडू लागवडी पासून साधारण 230 दिवसानंतर पहिला तोडा सुरु होतो. त्यामुळे गणेश उत्सव, दसरा, दिवाळी या सणानुसार तुम्ही लागवड करू शकतात. गणपतीसाठी 1 ऑगस्टला लागवड केली तर तो गणपतीमध्ये झेंडू काढण्यासाठी योतो. मल्चिंग पेपरचा वापर करताना सुरुवातीला भेसळ डोस हा ड्रॅपिंगमध्ये भरावा लागतो. त्यानंतर 21 दिवसापासून पुढं ड्रीपच्या खताचा वापर करावा. सुरुवातीला 19:19: सारखे ड्रीपचे खत दिले जातात पुढचे 21 दिवस 12: 61 सारखे खत दिले जातात आणि त्यानंतर 13:40:13 दिले जातात.
Agriculture News: मोसंबीची शेती खरंच नफा देते का? कसं करायचं नियोजन?
व्यवस्थापन वेळच्या वेळस करणे गरजेचे फुलांची गुंडी अवस्था तयार झाल्यानंतर ती गुंडी फेकून द्यावी लागते. जेणेकरून जास्त गुंड्या एकावेळेस निघाल्या पाहिजे. माल तोडनीला सोपे गेले पाहिजे. त्यामुळे पहिली गुंडी तोडून टाकत असल्यामुळे परत माल लागायला 15 दिवस लागतात. त्या दृष्टीने पिकाचे नियोजन आपण करणे गरजेचे आहे. बऱ्याच गुंड्या तोडल्यानंतर जेव्हा माल तोडणीला आल्यानंतर बाजार व्यवस्थापन हा सर्वात महत्वाचा भाग आहे. यामध्ये दोन प्रकार आहेत अळीचा प्रादुर्भाव सर्वात जास्त होतो आणि करपाचा प्रादुर्भाव जास्त होतो. यामध्ये फुलीची आळी,पाने खाणारी आळी यांचा समावेश असतो. त्यामुळे याचे व्यवस्थापन वेळच्या वेळस करणे गरजेचे आहे, असं रामेश्वर चांडक सांगतात.