बीड, 18 जानेवारी : बीड मध्ये आज कोपऱ्याकोपऱ्यावर खाद्यपदार्थांच्या गाड्या थाटलेल्या दिसतात. तेथे गर्दीही प्रचंड असते. बर्गर, नूडल्स आणि फ्राइजसारखे पदार्थ जिभेचे चोचले पुरवणारे आणि चवीला मस्त असतात. मात्र, शरीरासाठी ते अजिबात चांगले नसतात. निरोगी शरीरासाठी सकस आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वत:ला वेळ देऊ शकत नसल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. निरोगी राहण्यासाठी चांगली जीवनशैली व्यायाम आणि सकस आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे. पॅकबंद आणि प्रक्रिया केलेले पदार्थ आरोग्याला घातक असतात. मात्र, अलीकडे खाण्यामध्ये जंक फूडचे प्रमाण वाढले आहे. बीडच्या ग्रामीण भागात देखील अशा पदार्थाचे सेवन अधिक झाल्याने आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. पुरेशा आहारामध्ये संतुलित अन्न व पेय यांचा समावेश असतो, जे आपल्या शरीराला योग्यप्रकारे काम करण्यास इंधन पुरवतात. जर तुमच्या आहारात रस्त्यावर मिळणारे अन्न, हवाबंद अन्न व कँडी यांचा समावेश असेल, तर तुमचे पोट भरलेले राहील, परंतु त्याच्या शरीराची पोषण तत्त्वांची भूक मात्र अतृप्त राहण्याची शक्यता असते.
स्ट्रीट फूडचे गंभीर परिणाम स्ट्रीट फूडमधून शरीरात फॅटचे प्रमाण वाढू शकते. तसेच त्याचे शरीरावर गंभीर परिणाम देखील होऊ शकतात. धावपळीच्या जीवनशैलीत सकस आहारावर लक्ष देणे आवश्यक आहे. सकस आहार निरोगी आयुष्याचा मंत्र असल्याचे आहार तज्ञ डॉक्टर अनिल बारकू यांनी सांगितले. Video : विद्यार्थ्यांचा भन्नाट प्रयोग, कॉलेजमधील झाडं लागली बोलायला! आरोग्यदायी आहार मोड आलेली मटकी, गाजर, बीट, पालेभाजी, योग्य पाण्याचे प्रमाण ,तांदूळ, गहू, मका, ज्वारी, बाजरी, अंडी, कोंबडी, मटण व मांस, याचा रोजच्या आहारात तज्ञाच्या सल्ल्यानुसार समावेश करणे फायद्याचे ठरते.