बीड, 04 फेब्रुवारी : सध्याच्या काळामध्ये शहरी भागातील विद्यार्थी आधुनिक पद्धतीने शिक्षण घेत आहेत. मात्र, ग्रामीण भागामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देऊन अभ्यास करून घेतला जात आहे. बीड जिल्ह्यातील नागनाथ विद्यालयात दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास व्हावा यासाठी एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय, अभ्यास करणे सोपे व्हावे या उद्देशाने प्राचार्य, डी बी राऊत यांच्या संकल्पनेतून गट अभ्यासिका उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत पाचवी, ते बारावी, वर्गातील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार सहा ते सात विद्यार्थ्यांचा प्रत्येकी एक गट बनविण्यात आला आहे. असे प्रत्येक वर्गानुसार एकूण 8 ते 13 गट तयार करण्यात आले आहेत.
गट अभ्यास उपक्रम
सोमवार, ते शुक्रवार या वारामध्ये सकाळी साडेनऊ ते दहा असे विषयानिहाय पाचवी ते बारावी वर्गाचे गट नियोजन बनविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शंका निरसन, त्यांना मार्गदर्शन, त्यांच्यावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विद्यार्थी वेठीस, सर्व परीक्षा स्थगित
विद्यार्थ्यांना फायदा
गणित, विज्ञान, भूगोल, आणि इंग्रजी, या विषयांकडे विद्यार्थ्यांचे अधिक लक्ष देण्यात आले आहे. दहावी आणि बारावी, बोर्डाची परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे या वर्गातील विद्यार्थ्यांवर शिक्षक अधिक लक्ष देत आहेत. या उपक्रमाचा सर्वच विद्यार्थ्यांना आता मोठा फायदा होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.