मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शेतकऱ्याचा पाय खोलात! बँकेतील अनुदान परस्पर उचलले; 50 जणांची फसवणूक, बीडमध्ये खळबळ

शेतकऱ्याचा पाय खोलात! बँकेतील अनुदान परस्पर उचलले; 50 जणांची फसवणूक, बीडमध्ये खळबळ

50 शेतकऱ्यांच्या खात्यातील प्रोत्साहन पर अनुदान परस्पर उचलण्याची तक्रार शेतकऱ्यांनी दिली आहे.

50 शेतकऱ्यांच्या खात्यातील प्रोत्साहन पर अनुदान परस्पर उचलण्याची तक्रार शेतकऱ्यांनी दिली आहे.

50 शेतकऱ्यांच्या खात्यातील प्रोत्साहन पर अनुदान परस्पर उचलण्याची तक्रार शेतकऱ्यांनी दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid, India

बीड, 27 डिसेंबर : महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ति प्रोत्साहन पर योजनेंतर्गत 25 हजार अनुदान परस्पर उचलून आर्थिक फसवणूक केल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. बीडच्या चौसाळा जिल्हा मध्यवर्ती बँकेत ही घटना उघडकीस आला आहे. 50 शेतकऱ्यांच्या खात्यातील प्रोत्साहन पर अनुदान परस्पर उचलण्याची तक्रार शेतकऱ्यांनी दिली आहे.

तर तक्रार न दिलेले यांची संख्या शेकडो आहे. यात मोठे रॅकेट सक्रीय असल्याचा अंदाज शक्यता व्यक्त केला जात आहे. त्यामूळे खळबळ उडाली असून चौकशी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी "महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेंतर्गत 50 हजार रूपये अनुदान खात्यावर जमा करण्यात येते. मात्र, बँकेतील अधिकारी यांनी संगनमताने परस्पर पैसे उचलुन शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे यात उघडकीस आले आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखा ता.जि.बीड या बँकेतील मौजे. गोलंग्री ता.जि.बीड येथील खातेदार शिवाजी प्रल्हाद कवडे, लक्ष्मण प्रल्हाद कवडे, बाळु दगडु पवार, वृंदावणी बाबासाहेब कदम, सुरेश बारीकराव कवडे यांच्या खात्यामधुन महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेंतर्गत खात्यावर 50 हजार रूपये जमा झाल्याचे मोबाईलवर मेसेज आले होते.

हेही वाचा - विवाहित प्रेयसीसोबत प्रियकराचं भयानक कृत्य, स्वत:ही उचललं टोकाचं पाऊल

परंतु यांच्या खात्यावरून परस्पर प्रत्येकी 25 हजार रूपये अनुदान अज्ञात व्यक्तिने उचलल्याचे उघडकीस आले आहे. याविषयी बॅकेत विचारणा केल्यावर मॅनेजर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर आज लेखी तक्रार करण्यात आली.

First published:
top videos

    Tags: Beed news, Financial fraud, Money fraud