बीड, 24 जानेवारी : शेती परवडत नाही असे बहुतांश शेतकऱ्यांची ओरड असते. परंतु इच्छाशक्ती असेल तर शेती नक्की परवडते आणि लाखोंचं उत्पादन सुद्धा घेता येतं. बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं दोन एकर क्षेत्रावर झेंडू फुलाची लागवड करत लाखों रुपयांची कमाई केली आहे.
शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे आपला मोर्चा वळवत आहेत. कमी मेहनत आणि अगदी कमी वेळात जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे अशी प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा असते. बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आधुनिक शेती करत लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
लाखोंचे उत्पन्न
बीड जिल्ह्यातील लवूळ या गावातील आनंद शिंदे यांनी त्यांच्या दोन एकर क्षेत्रावर झेंडू फुलाची लागवड केली. यामधून 20 टन झेंडू फुलाचे उत्पादन झाले असून अवघ्या दोन महिन्यामध्ये 4 लाख 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
पारंपारिक शेतीला फाटा
फुलांना सध्या चाळीस रुपये ते शंभर रुपये प्रति किलो इतका भाव मिळत आहे. मुंबईसह हैदराबाद व परराज्यातील बाजारपेठ ही फूल विकली जात आहेत. पूर्वी याच दोन एकरावर शिंदे यांनी सोयाबीन पिकाची लागवड केली होती. मात्र, बाजारपेठेत योग्य ते भाव मिळत नसल्यामुळे त्यांनी सोयाबीन पिकाची लागवड न करता झेंडूच्या झाडांची लागवड केली.
Beed : सरकारी कामांमुळे नशीब पालटलं, शेतकरी होतोय मालामाल! पाहा Video
आधुनिक शेती
आमच्या भागातील शेतकरी हा पारंपारिक शेती करतो. मात्र, सध्या आधुनिक युगाच्या काळामध्ये शेतांमध्ये वेगवेगळे प्रयोग करायला हवेत. शेतीत काहींना यश तर काहींना अपयश देखील मिळते. मात्र आधुनिक पद्धतीने केलेल्या शेतीमुळे कमी वेळामध्ये जास्त उत्पन्न मिळू शकते अशी माहिती शेतकरी, आनंद शिंदे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.