मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Beed: ऊसतोड कामगारांच्या बीड जिल्ह्यातच शेतकरी अडचणीत, 3 महिने उलटले तरी...

Beed: ऊसतोड कामगारांच्या बीड जिल्ह्यातच शेतकरी अडचणीत, 3 महिने उलटले तरी...

Farmer Problem : संपूर्ण देशाला ऊसतोड कामगार पुरवणारा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. याच जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडलाय.

Farmer Problem : संपूर्ण देशाला ऊसतोड कामगार पुरवणारा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. याच जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडलाय.

Farmer Problem : संपूर्ण देशाला ऊसतोड कामगार पुरवणारा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. याच जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडलाय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

    रोहित देशपांडे, प्रतिनिधी

    बीड, 7 फेब्रुवारी : बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ऊसतोडणीच्या हंगामात सर्वाधिक कामगार बीड जिल्ह्यातून देशभर जातात. संपूर्ण देशाची गरज भासवणाऱ्या या जिल्ह्यातच सध्या ऊसतोड कामगारांची कमतरता भासत आहे.

    काय आहे समस्या?

    बीड जिल्ह्यात जवळपास 8 लाख ऊसतोड कामगार आहेत. यामधील 50 टक्के कामगार दरवर्षी हंगाम सुरू झाल्यानंतर कामासाठी परराज्यात जातात. बीड जिल्ह्यामध्ये साखर कारखान्याचा हंगामा सुरू होऊन तिसरा महिना उलटला आहे तरी जिल्ह्यातील माजलगाव, तालुक्यामध्ये जवळपास 10 हजार हेक्टर, वरील ऊस शेतातच उभा आहे.

    अनेक साखर कारखाण्यांनी ऊस टोळ्यांशी करार केला असला तरी जास्त पैसा मिळत असल्यानं कामगारांचा परराज्यात जाण्याचा कल वाढलाय. त्यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवत आहे.

    'शेतात गांजा लावू द्या', बेरोजगार अभियंत्याने केली मागणी, पत्र व्हायरल

    किती आहे फरक?

    बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना एका कोयत्याला 1 लाख ते 1 लाख 20 हजार रूपये मिळतात. तर कर्नाटकमध्ये याच कामासाठी 1 लाख 40 हजार ते 1 लाख 50 हजार दर आहे. एका कोयत्यामागे दर जास्त मिळत असल्यानं जिल्ह्यातील कामगार इतर राज्यात जात आहेत. परराज्यातील कारखानदार ऊस तोडणी कामगारांना अधिक दर देत असल्यानं जिल्ह्यातील कारखान्यांना कामगारांची कमतरता जाणवत आहे, असं मत शेतकरी नेते गंगाभीषण तावरे यांनी व्यक्त केलंय.

    बीड जिल्ह्यातील माजलगावच्या  लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्याने 4 लाख 44 हजार मेट्रिक टन इतकं गाळप केलं आहे. जय महेश कारखान्यानं 6 लाख 93 हजार 371 मेट्रिक टन तर छत्रपती कारखान्यानं 2 लाख 13 हजार 430 मेट्रिक टन गाळप आत्तापर्यंत केलं आहे.

    First published:

    Tags: Beed, Farmer, Local18, Sugarcane farmer