बीड, 31 जानेवारी : महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय असा पदार्थ ते म्हणजे पुरणपोळी. महाराष्ट्रात पुरणपोळीला एक वेगळं महत्त्व आहे. पुरणपोळी हा पदार्थ सण उत्सवाच्या दिवशी आवर्जून खाल्ला जातो. आजच्या घाई गडबडीच्या जीवनशैलीत अनेकांना पूर्वीसारखे पुरणपोळ्या करणे जमत नाही. त्यामुळेच बीडमधील भोजनालयात देखील आता अस्सल पुरणपोळीची प्लेट उपलब्ध झालेली आहे. बीड करांनी देखील या जेवणाला चांगली पसंती दिली आहे. बीड शहरातील स्टेडियम रोड परिसरामध्ये कामधेनू या भोजनालयाची सुरुवात साधारणता 28 वर्षांपूर्वी झाली. सुरुवातीला या भोजनालयामध्ये राईस प्लेट आणि नेहमी खाल्ले जाणारे खाद्यपदार्थ उपलब्ध होते. मात्र या हॉटेलच्या मालकीण मंजुषा कुलकर्णी यांनी याच भोजनालयामध्ये पुरणपोळी, हा पदार्थ सुरू केला. पुरणपोळीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सर्वच पदार्थ चवदार पुरण बनवण्यासाठी हरभऱ्याची डाळ, गूळ, वेलची, जायफळ असे घटक एकत्र करून पुरणपोळी केली जाते. पुरणपोळीच्या प्लेटमध्ये कडी, भजे, कुरडया, आमटी, पंचामृत, कोशिंबीर, आणि घरगुती तूप, दिले जाते. प्लेटमध्ये असणारे सर्वच पदार्थ अधिकच चवदार लागतात आणि खवय्ये यावर ताव मारायला सुरुवात करतात. पुण्यात मिळतोय भन्नाट तंदूर वडापाव, एकदा खाल तर पुन्हा याल! Video लाखोंची कमाई पुरणपोळी प्लेटच्या सुरुवात केली त्यावेळी 100 रुपये प्लेट प्रमाणे दिवसाकाठी 5 ते 10 प्लेटची विक्री व्हायची. आता या प्लेटचा दर 250 रुपये पोहोचला असून दिवसाकाठी 30 ते 40 पुरणपोळी प्लेटची विक्री होत आहे. यातून मंजुषा यांना लाखोंची कमाई होत आहे.