मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /डोळ्यासमोर पीक जळताना पाहून शेतकऱ्यानं फेसबुक लाईव्ह करत उचललं भयानक पाऊल

डोळ्यासमोर पीक जळताना पाहून शेतकऱ्यानं फेसबुक लाईव्ह करत उचललं भयानक पाऊल

मृत शेतकरी नारायण भगवान वाघमोडे

मृत शेतकरी नारायण भगवान वाघमोडे

महावितरण ऐन हंगामात वीज कनेक्शन तोडल्याने रब्बी पीक जळून जात आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid, India

बीड, 3 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. तर शेतकरी बळीराजाही या ना त्या कारणाने संकटात आहे. यातच आता बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महावितरणने वीज कनेक्शन कट केल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी फेसबुक लाईव्ह करत विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मागील 8 दिवसांपासून या शेतकऱ्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. ही धक्कादायक घटना गेवराई तालुक्यातील मालेगाव बुद्रुक येथील आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

महावितरणने ऐन हंगामात वीज कनेक्शन तोडल्याने शेतकऱ्याचे रब्बी हंगामातील पीक जळून जात आहे. आता पीक वाचवू कसे, या विवचनेतून आता सर्व संपलं म्हणत एका शेतकऱ्याने विष पित आत्महत्येचा प्रयत्न केला. बीडच्या गेवराई तालुक्यातील मालेगाव बुद्रुक गावातील या घटनेने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी फेसबुक लाईव्ह करत विष घेतले आहे. नारायण भगवान वाघमोडे, असे विष घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

या शेतकऱ्यावर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच या शेतकऱ्याची आठ दिवसापासूनच मृत्यूशी झुंज सुरू आहे. गावातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. नारायण वाघमोडे यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला महावितरण जबाबदार असेल, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

हेही वाचा - सातारा : उधारीचे पैसे देऊ शकत नव्हता म्हणून पत्नीला म्हणाला..., मित्रानेही साधला तो डाव

एकाच जिल्ह्यात सारख्या चेहऱ्यांचे 61 हजार मतदार - 

बीड जिल्ह्यामध्ये सारख्या चेहऱ्यांचे तब्बल 61 हजार 270 मतदार असल्याचं समोर आलं आहे. यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार असण्याची शक्यताही प्रशासनाने व्यक्त केली आहे. यात एकाच मतदाराने दोन-दोन तीन-तीन ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदणी केल्याने असे प्रकार घडत असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

एकाच मतदाराची दोन-तीन ठिकाणी नोंदणी करून बोगस मतदान करण्याचं रॅकेट सक्रीय असल्याचा आरोप बीडमधले सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी केला आहे. निवडणूक अधिकारी आणि राजकीय नेते याचा गैरवापर करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

प्रशासनाने आता फोटोवरून साम्य असलेले 61 हजार मतदार शोधले, हा आकडा खूप मोठा आहे. यामुळे निवडणुकीच्या निकालावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नावामधील साम्य असलेले बोगस मतदारही कमी करावेत, अशी मागणी ढवळे यांनी केली आहे.

First published:
top videos

    Tags: Beed, Beed news, Electricity cut, Farmer