जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बीड : धरणात बुडालेल्या डॉक्टरची सुरू होती शोधाशोध, बचावकार्यादरम्यान NDRFच्या जवानाचाच दुर्दैवी अंत

बीड : धरणात बुडालेल्या डॉक्टरची सुरू होती शोधाशोध, बचावकार्यादरम्यान NDRFच्या जवानाचाच दुर्दैवी अंत

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ हे बीडच्या माजलगाव धरणात पोहायला गेले होते.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

बीड, 19 सप्टेंबर : बचाव कार्य करताना एनडीआरएफ टीम मधील जवानाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बीडच्या माजलगाव येथील धरणात बुडालेल्या डॉक्टरचा मृतदेह शोधतांना एनडीआरएफचे 2 जवान पाण्यात पडले होते. यावेळी एका जवानाला वाचवण्यात यश आलं आहे. तर एका जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राजू मोरे असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ हे बीडच्या माजलगाव धरणात पोहायला गेले होते. मात्र, ते धरणात बुडाल्याने त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले.डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ यांचा मृतदेह 24 तासानंतरही बचाव पथकाला मिळालेला नाही. मात्र, या बचावकार्या दरम्यान आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे. एनडीआरएफच्या कोल्हापूर येथील बचाव पथकातील कर्मचारी राजू मोरे, आणि शुभम काटकर हे पाण्यात अडकले होते. यावेळी शुभम काटकर यांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर मच्छिमारांनी लावलेल्या जाळ्यात मोरे हे अडकले होते. यावेळी त्यांना ओढून बाहेर काढत असताना, त्यांचा ऑक्सिजन सिलींडर निसटून वर आला होता. दरम्यान, काही वेळापूर्वी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यासह जवानांच्या टीमला मोरे यांना बाहेर काढण्यात यश आलंय. मात्र, यावेळी त्यांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं असता, डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले आहे. हेही वाचा -  Nashik : हार्ट अटॅक आला तर घाबरू नका, ‘या’ पद्धतीनं वाचवा रूग्णाचा जीव, VIDEO दरम्यान, 31 तासांपासून शोध मोहीम सुरू असताना देखील अद्याप डॉक्टरांचा मृतदेह सापडण्यात प्रशासनाला यश आले नाही. यामुळे जिल्हा प्रशासन, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि एनडीआरएफच्या टीमच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात