जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Beed News: अधिक महिन्यात होणार भक्तांची निराशा, पुरुषोत्तम मंदिराबाबत आली महत्त्वाची बातमी

Beed News: अधिक महिन्यात होणार भक्तांची निराशा, पुरुषोत्तम मंदिराबाबत आली महत्त्वाची बातमी

Beed News: अधिक महिन्यात होणार भक्तांची निराशा, पुरुषोत्तम मंदिराबाबत आली महत्त्वाची बातमी

हिंदू धर्मात अधिक मासला विशेष महत्त्व आहे. बीडमधील एकमेव पुरुषोत्तम मंदिरात या महिन्यात भाविकांची मोठी गर्दी असते.

  • -MIN READ Bid,Bid,Maharashtra
  • Last Updated :

    रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 24 एप्रिल: प्रत्येक गाव आणि शहरात धार्मिक महत्त्व असणारी ऐतिहासिक मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. बीड जिल्ह्यातही अशी ऐतिहासिक वारसा असणारी मंदिरे आहेत. माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपूर येथे भारतातील एकमेव पुरुषोत्तमाचे मंदिर आहे. मात्र आता अधिक मासाच्या काळामध्ये या मंदिरात भाविकांना दर्शन घेता येणार नाही. देशातील एकमेव पुरुषोत्तम मंदिर पुरुषोत्तमपूर येथील मंदिर हे देशातील एकमेव पुरुषोत्तम मंदिर आहे. या मंदिराला मोठा ऐतिहासिक वारसा असून मंदिर यादव काळात बांधले आहे. शेकडो वर्षांचा पुरातन वारसा असणाऱ्या या मंदिरातील भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. यंदा या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    अधिक मासात भाविकांची गर्दी अधिक मासाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. अधिक मासाला मलमास किंवा पुरुषोत्तमास असेही म्हटले जाते. या महिन्यात पुरोषत्तम मंदिरात दर्शनासाठी देशभरातील भक्त येतात. त्यामुळे पुरुषोत्तमपूरला यात्रेचे स्वरूप आलेले असते. यंदा अधिका मासात मंदिरात दर्शन नाही पुरातन पुरुषोत्तम मंदिरास काही ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे यंदा मंदिराच्या जीर्णोद्धराचे काम होणार आहे. त्यामुळे अधिक मासात भाविकांना मंदिरातून दर्शन घेता येणार नाही. भगवान पुरुषोत्तमाची मूर्ती एका शेडमध्ये ठेवण्यात येणार असून त्या ठिकाणी जाऊन भाविक दर्शन घेऊ शकतात. 28 एप्रिल रोजी तीन दिवस विधिवत पूजा करून मंदिरातून मूर्ती हलविण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिराचे ट्रस्टी विजय गोळेकर यांनी दिली. ram mandir ayodhya: 167 खांब आणि खास दगडं, राम मंदिराच्या बांधकामाचे नवे PHOTOS जीर्णोद्धारासाठी 55 कोटींचा निधी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी असताना या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर आता केंद्रेकर हे विभागीय आयुक्त पदावर कार्यरत आहेत. त्यांनी या मंदिराला निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे आता या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी शासनाकडून जवळपास 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंदिराचा जिर्णोद्धाराचे काम सुरू झाले असून 2024 पर्यंत या मंदिराचे सर्व काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात