मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवात तरुणांचा भयानक राडा, VIDEO व्हायरल

धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवात तरुणांचा भयानक राडा, VIDEO व्हायरल

नाथ प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या लावणी महोत्सवात अति उत्साही तरुणांची पुन्हा हुल्लडबाजी बघायला मिळाली.

नाथ प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या लावणी महोत्सवात अति उत्साही तरुणांची पुन्हा हुल्लडबाजी बघायला मिळाली.

नाथ प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या लावणी महोत्सवात अति उत्साही तरुणांची पुन्हा हुल्लडबाजी बघायला मिळाली.

बीड, 7 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानचा गणेशोत्सव हा पहिल्या दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावेळी चर्चेत येण्यामागील कारण म्हणजे नाथ प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या लावणी महोत्सवात अति उत्साही तरुणांची पुन्हा हुल्लडबाजी बघायला मिळाली. प्रसिद्ध नृत्यांगना मानसी नाईक आणि बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल यांच्या उपस्थित सुरु असलेल्या लावणी महोत्सवात संबंधित धक्कादायक प्रकार बघायला मिळाला. या कार्यक्रमात काही तरुणांनी प्रचंड गोंधळ घातला. हुल्लडबाज तरुणांनी मंडपातील खुर्च्या फोडल्या. त्यांच्या या कृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बीडच्या परळी येथील नाथ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सवात पुन्हा अति उत्साही तरुणांनी गोंधळ घातला. यावेळी हुल्लडबाजी करताना तरुणांनी खुर्च्यांची तोडफोड केली. संबंधित प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. परळीत मंगळवारी (7 सप्टेंबर) प्रसिद्ध नृत्यांगना मानसी नाईक आणि बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल यांच्या उपस्थितीत लावणी महोत्सव पार पडला. याचवेळी गाणी सुरु असताना तरुणांनी मोठ्या प्रमाणात खुर्च्यांची तोडफोड केलीय. त्यामुळे या मंडपात तुटलेला खुर्च्यांचा ढीग पडलाय. दरम्यान घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह असताना नाथ प्रतिष्ठानने परळीत आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात पहिल्याच दिवशी लावण्या आणि अश्लील नृत्य सादर करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम चालला. या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजीदेखील बघायला मिळाली होती. त्यामुळे पोलिसांना काही प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला होता. पहिल्या दिवशी घडलेल्या या घटनेवर सर्वसामान्यांकडून टीका करण्यात आली होती. पण दुसऱ्या दिवशी देखील फार काही परिस्थिती बदललेली दिसली नव्हती. (सायरस मिस्त्रींच्या अपघातावेळी काय झालं? मर्सिडिजच्या चिपचा रिपोर्ट समोर) दुसऱ्या दिवसी कोमल पाटोळे यांचा जागरण गोंधळ, भारुड आणि गवळण सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात परळीतील नागरिकांची प्रचंड गर्दी केली होती. गर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याने गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांकडून तरुण प्रेक्षकाला लाठीने बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामुळे नाथ प्रतिष्ठांच्या उत्सवाचे वेगळी चर्चा होत आहे.
First published:

पुढील बातम्या