जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धनंजय मुंडेंचं ग्रँड वेलकम भोवलं, पोलिसांनी केली थेट कारवाई

धनंजय मुंडेंचं ग्रँड वेलकम भोवलं, पोलिसांनी केली थेट कारवाई

धनंजय मुंडे यांची‎ मिरवणूक आणि सभेसाठी पोलिसांनी‎ रात्री दहा वाजेपर्यंत‎ परवानगी दिली होती.

धनंजय मुंडे यांची‎ मिरवणूक आणि सभेसाठी पोलिसांनी‎ रात्री दहा वाजेपर्यंत‎ परवानगी दिली होती.

धनंजय मुंडे यांची‎ मिरवणूक आणि सभेसाठी पोलिसांनी‎ रात्री दहा वाजेपर्यंत‎ परवानगी दिली होती.

  • -MIN READ Bid,Bid,Maharashtra
  • Last Updated :

बीड, 14 फेब्रुवारी : आजारातून बरं झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचं परळी मतदारसंघामध्ये ग्रँड वेलकम करण्यात आलं होतं. पण उशिरापर्यंत मिरवणूक आणि सभा घेणे चांगलेच भोवले आहे. धनंजय मुंडेंचे कट्टर समर्थक वाल्मीक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (व्हॅलनटाईन डेला ‘ब्रेकअप’चा निर्णय? मंगळवारी शिवसेनेची ‘सुप्रीम’ सुनावणी!) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री‎ आमदार धनंजय मुंडे यांची‎ मिरवणूक आणि सभेसाठी पोलिसांनी‎ रात्री दहा वाजेपर्यंत‎ परवानगी दिली होती. मात्रस रात्री‎ ११.५५ पर्यंत मिरवणूक सभा‎ चालल्याने कायद्याचे उल्लंघन झाल्या प्रकरणी‎ परळी शहर पोलीस ठाण्यात कार्यक्रमाचे आयोजक‎ वाल्मीक कराड यांच्यावर गुन्हा‎ दाखल करण्यात आला आहे. (शिवसेना कोणाची? ‘भावनेवर निर्णय होत नाही तर..’ SC आधीच बच्चू कडू यांचं मोठं भाकीत) धंनजय मुंडे हे रविवारी परळी‎ शहरात येणार असल्याने त्यांचे‎ स्वागत मिरवणुक व सभेसाठी‎ स्पिकर वाजवण्यासाठी पोलिसांनी‎ सायंकाळ पाच ते दहा‎ वाजेपर्यंत परवानगी दिली होती.‎ परंतु धंनजय मुंडे यांची‎ स्वागत सभा रात्री ११.५५ पर्यंत‎ चालली. त्यामुळे पोलिसांनी‎ दिलेल्या परवानगीचे उल्लंघन‎ झाल्या प्रकरणी पोलीस अंमलदार‎ विष्णू फड यांनी परळी शहर‎ ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून‎ कार्यक्रमाचे आयोजन वाल्मिक‎ कराड यांच्यावर गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे.‎

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात