बीड, 14 जून : महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल (Maharashtra state Board 12th Result 2022) नुकताच जाहीर झाला. निकाल तर लागला पण आता पुढे काय? (Career After 12th Science) करिअरमध्ये चांगली भरारी घेण्यासाठी पुढे कोणत्या क्षेत्रात शिक्षण घेणं आवश्यक आहे? असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आले असतील. काही विद्यार्थी संभ्रमातही असतील. पण आता चिंता करू नका. जर तुम्हाला कॉम्प्युटर क्षेत्रात रुची असेल आज आम्ही तुम्हाला दोन कोर्सेसबद्दल (Some important courses after 12th Science) सांगणार आहोत.
वाचा : आपण सवयीने खोटं बोलतो? की त्यामागं दुसरं काही कारण आहे? संशोधनातून मिळालं उत्तर
निकाल लागताच आपण कोणत्या क्षेत्रात जावं असा विद्यार्थांसमोर मोठा प्रश्न असतो. काॅम्प्युटर क्षेत्राची आवड असणाऱ्या विद्यार्थांना मोठं करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. बीसीएस अर्थातच बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स आणि आणि बीसीए अर्थातच बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन यात तुम्ही मोठ करिअर घडून शकता. यासाठी बीड शहरात वेगवेगळे इन्स्टिट्यूट देखील आता उपलब्ध आहेत.
सध्या कॉम्प्युटरचा जमाना असल्याचं म्हटलं जातं. यात दिवसागणिक नवनवीन बदल होताना पाहयला मिळत आहेत. आधुनिक युगात कॉम्प्युटर हे महत्त्वाचा घटक बनला आहे. प्रत्येक क्षेत्रातील कामांसाठी आता कॉम्प्युटरचा उपयोग होत आहे. त्यामुळे या क्षेत्रांत नोकरीच्या संधी देखील जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत.
3 वर्षात होणार होणार कोर्स पूर्ण बीड येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ठिकाणी बारावी सायन्सनंतर बीसीए आणि बीसीएस असे तीन वर्षाच्या कालावधीसाठी असणारे कोर्स उपलब्ध आहेत. हे सर्व कोर्स ग्रॅज्युएशन पद्धतीचे आहेत. बीसीए या ग्रॅज्युएशन पद्धतीच्या कोर्ससाठी एकूण 50 जागा तर बीसीएस या ग्रॅज्युएशन पद्धतीच्या कोर्ससाठी एकूण 60 जागा असणार आहेत.
वाचा : Business Idea: केवळ 1 लाखात सुरू करा हा सुपरहिट बिझनेस, दर महिन्याला 8 लाखांची होईल कमाई
महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉलेजचे प्राचार्य जोजो जोरफ सांगतात की, “इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या कोर्ससाठी आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे. या क्षेत्रात आयटीसह शासकीय विभागात देखील नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. मागील वर्षी 17 विद्यार्थ्यांना खासगी आणि शासकीय विभागात नोकरीच्या संधी उपलब्ध झाली होती. प्रामुख्याने मायक्रोसॉफ्टमध्ये आणि टेकमहिंद्रा यासह डिफेन्स आणि पोलीस सायबर विभागात विद्यार्थी सध्या कार्यरत आहेत.”
प्रवेश प्रक्रिया आणि काॅलेज पत्ता कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने पार पडणार आहे. इन्स्टिट्यूटमध्ये एटीट्यूट सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहेत. काही दिवसातच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आदित्य टावर, पांगरी रोड, शाहूनगर बीड, संपर्क क्रमांक 02442 221733.
महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी …या मोठ्या कंपनीत आहेत जाॅबच्या संधी ऑटीसीएस इन्फॉर्मेशन, मायक्रोसोफ्ट, टेक महिंद्रा, इन्फोसिस, अशा मोठ्या खाजगी कंपन्यांसह शासकीय क्षेत्रात या कोर्सननंतर जॉबच्या संधी उपलब्ध असतील. तर टीसीएस इन्फॉर्मेशन, मायक्रोसोफ्ट, टेक महिंद्रा, इन्फोसिस, आयटीसी विप्रो रिलायन्स ,अशा खाजगी कंपन्यांसह शासकीय क्षेत्रात येथील विद्यार्यांनाचे प्लेसमेंट होते.