जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Beed News : ऊसतोड मजुरांची व्यथा नव्हे चित्त्तरकथा; 'ते' 95 पीडित कुटुंब अजूनही प्रतिक्षेत

Beed News : ऊसतोड मजुरांची व्यथा नव्हे चित्त्तरकथा; 'ते' 95 पीडित कुटुंब अजूनही प्रतिक्षेत

ऊसतोड मजुरांची व्यथा नव्हे चित्त्तरकथा

ऊसतोड मजुरांची व्यथा नव्हे चित्त्तरकथा

Beed News : बीड जिल्ह्यातील 95 मृत ऊसतोड मजुरांच्या कुटुंबियांना शासनाकडून एक रुपयाही मदत नाही. परिणामी कुटुंब उघड्यावर आली आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड, 8 जून : पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड मजुरीला जाणाऱ्या ऊसतोड मजुराचा अपघाती मृत्यू झाला. अपंगत्व आलं तर अख्ख कुटुंब उघड्यावर येतं. बीड जिल्ह्यातच नाही तर राज्यात ऊसतोड मुजराच्या नावाने राजकारण करणारे नेते लोकप्रतिनिधि मात्र या बाबतीत गप्प आहेत. ऊसतोड मजूर महामंडळ देखील नावालाच आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. ऊसतोड मजुरांची व्यथा नव्हे चित्तरकथा. ऊस तोडणीमुळे माझ्या घरातली दोन माणसं गेली.. बीड शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या आहेर धानोरा गावातील अंकुश कुटुंब. रोजगार मिळत नाही, शेती नाही म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी कधी पश्चिम महाराष्ट्र तर कधी कर्नाटकात ऊस तोडणीसाठी सहा महिने जातात. चारच महिन्यापूर्वी मुलीचे लग्न झालं. मुलगी आणि जावयाला घेऊन सातारा जिल्ह्यात ऊस तोडणीला गेले होते. बाकीचे फडात ऊसतोडणी करत असताना मुलगी विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली आणि पाय घसरून पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे ऊस तोडणीला जाऊ वाटत नव्हतं. मात्र, दुसरा पर्याय नसल्याने जावं लागलं. तर यावर्षी उसाची गाडी भरत असताना मोळी घेऊन शिडीवर चढताना पती पाय घसरून खाली पडले. उपचारासाठी आठ लाख रुपये गेले. मात्र, तरीही ते वाचले नाहीत. ऊस तोडणीमुळे माझ्या घरातली दोन माणसं गेली. आता डोक्यावर आठ लाखांच्या कर्जाचा बोजा आहे, असं सांगताना अंजनाबाई यांच्या डोळ्यात पाणी आले. मात्र, यानंतर शासन किंवा कारखान्याकडून एक रुपयाही मिळाला नाही, असं रामा अंकुश यांचा मुलगा अंकुश रामा अंकुश यांनी सांगितलं. तर याच गावातील ट्रॅक्टर चालक व ऊसतोड मजूर वसंत इंगोले ऊस तोडणी करत असताना ट्रॅक्टरचा अपघात झाला आणि त्यात कर्नाटकमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आज घरातील कर्ता पुरुष गेल्याने वसंत इंगोले यांच्या पत्नीसमोर दुःखाचा डोंगर उभा राहिला. या तीन लेकरांना जगवायचं कसं असा प्रश्न त्या विचारत आहेत. तर या कुटुंबाला सरकारकडून अद्याप काहीच मदत मिळाली नाही किंवा ऊसतोड नेत्यांनी देखील विचारपूस केली नाही. वाचा - ST BUS : तोंडाने डिझेल ओढून एसटीत भरताना धक्कादायक घडलं; परांडा एसटी आगारातील प्रकार तब्बल 95 ऊसतोड मजूरांचा अपघाती मृत्यू या दोनच कुटुंबासमोर अशी दयनीय परिस्थिती आहे, असं नाही तर जिल्ह्यातील तब्बल 95 ऊसतोड मजूर कुटुंबामधील व्यक्तींचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून एक रुपयाही मदत मिळाली नाही. तर ऊस तोडणी करताना अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आलेले 45 जण देखील मदतीपासून वंचित आहेत. ऊसतोड मजुरांच्या नावाने राजकारण करणारे मुंडे बंधू भगिनी देखील यावर बोलायला तयार नाहीत. गेल्या 40 वर्षांपासून ऊसतोड मजुरांच्या सोबत आहे, मी देखील ऊसतोड मजूर म्हणून काम केले आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर विनायक रावजी मेटे यांनी ऊसतोड मजुरांसाठी संघर्ष केला. मात्र, आज ऊसतोड मजुरांच्या नावाने राजकारण करणारे त्यांच्या सुरक्षेबाबत कधीही विचार करत नाहीत. शासनाकडूनही फक्त महामंडळाची घोषणा झाली. अद्याप एकाही ऊसतोड मजुराला याचा फायदा झाला नाही. ऊसतोड मजूर व मुकादम असलेले बाबासाहेब गुरसाळे यांनी सांगितलं. या ऊसतोड मुलांना मदत मिळावी म्हणून धडपडणारे महाराष्ट्र ऊसतोड मजुर संघटनेचे नेते बबनराव माने यांनी परिस्थिती संदर्भात सांगताना ऊसतोड मजूर महामंडळ आणि शासनाकडून फक्त आश्वासनाचे गाजर दिले जाते आणि यांच्या नावाने राजकारण करणारे ऊसतोड मजुरांचे नेते म्हणून घेणारे फक्त स्वतःची पोळी भाजून घेतात. दोन वर्षात अद्याप यांच्याकडे कोणी फिरकले देखील नाही, असं बबनराव माने यांनी सांगितलं. वाचा - वऱ्हाड्यांची बस कोसळली दरीत, लग्नादिवशीच निघाल्या अंत्ययात्रा, 25 जणांचा मृत्यू बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या प्रश्न संदर्भात लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ याचे व्यवस्थापक बाळासाहेब सोळंकी यांना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फोन घेतला केला नाही. तसेच बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड मजूर महामंडळाचे परळी येथील कार्यालयात काम पाहणारे जयश्री सोनकवडे यांनी देखील फोन घेतला नाही. त्यामुळे ऊसतोड मजूर महामंडळाच्या बाजू समजू शकली नाही.. ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात हाताला काम मिळत नाही म्हणून मजबुरीने ऊसतोड मजुरी करण्यासाठी जाणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या सुविधांकडे मात्र दुर्लक्ष केले गेले. मग ऊसतोड मजुरांच्या नावाने राजकारण करणारे स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणारे नेते मयत 95 ऊसतोड मजुरांच्या कुटुंबाच्या फाटक्या पदरात सुरक्षेचा दान टाकणार का? राज्याचा आकडा पाचशेच्या घरात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात